Satbara Utara: शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! सातबारा उतारा आता थेट व्हॉट्सअपवर

Satbara Utara on WhatsApp : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची आणि क्रांतिकारी बातमी आहे. जमिनीच्या कागदपत्रांसाठी तलाठी कार्यालयात किंवा सेतू केंद्रांवर जाण्याची गरज आता संपणार आहे. भूमी अभिलेख विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
Satbara Utara on WhatsApp
Satbara Utara on WhatsAppsaam tv
Published On

महाराष्ट्र सरकारच्या महाभूमी अभिलेख विभागाने शेतकऱ्यांसाठी एक ऐतिहासिक आणि सोयीस्कर डिजिटल सेवा सुरू केली आहे. येत्या १ ऑगस्ट २०२५ पासून सातबारा उतारा, ८अ उतारा, फेरफाराची नोंद आणि ई-रेकॉर्ड्स हे महत्त्वाचे दस्तऐवज नागरिकांना केवळ १५ रुपयांत थेट व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार आहेत. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ही योजना १५ जुलैपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार आहे. संपूर्ण राज्यात ही योजना पारदर्शक आणि सुरक्षित कागदपत्र सेवा प्रदान करण्यास फायदेशीर ठरणार आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिकांना आता जमिनीशी संबंधित कागदपत्रांसाठी महा ई-सेवा केंद्रांवर रांगा लावण्याची गरज नाही.

भूमी अभिलेख विभागाने ही एक नवी डिजिटल सुविधा सुरू केली असून ज्याद्वारे सातबारा, ८अ उतारे, फेरफार नोंदी आणि ई-रेकॉर्ड थेट व्हॉट्सअ‍ॅपवर मिळू शकणार आहे. मुख्य म्हणजे यामुळे फसणवूकीचे प्रकार टाळले जाऊ शकणार आहेत.

Satbara Utara on WhatsApp
Jivant Satbara: 'जिवंत' सातबारा म्हणजे काय रं, तात्या?

अवघ्या १५ रूपयांत सेवा उपलब्ध

या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना महा ई-सेवा केंद्रांवर धावपळ करण्याची गरज भासणार नाही. वेळ आणि खर्च वाचवणारी ही योजना कागदपत्रांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मुख्य म्हणजे ही सेवा केवळ १५ रुपयांमध्ये आहे. यामुळे कागदपत्रांच्या गैरवापराची भीती कमी होणार आहे.

या सेवेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना महाभूमी पोर्टल (https://bhumiabhilekh.mahabhumi.gov.in) वर जावं लागणार आहे. या पोर्टलवर जाऊन नागरिकांना आपला मोबाईल क्रमांक नोंदवावा लागणार आहे.

नोंदणीसाठी एकदाच ५० रुपये शुल्क आणि जमिनीच्या मालकीचा पुरावा द्यावा लागणार आहे. यावेळी मोबाईल क्रमांक OTP द्वारे पडताळला जाणार आहे. यावेळी नोंदणी पूर्ण झाल्यानंतर सातबारा, ८अ, फेरफार नोंदी आणि ई-रेकॉर्ड्स सहजपणे व्हॉट्सअ‍ॅपवर डाउनलोड करता येतील.

Satbara Utara on WhatsApp
Satbara Utara : सातबारा उताऱ्यासंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय, महसूल विभागाचे परिपत्रक जारी

जमिनीशी संबंधित कायदे, प्रक्रिया, आणि माहितीबाबत जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर त्यांचं मार्गदर्शन मिळणार आहे. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असल्यामुळे मध्यस्थांचा अथवा एजंटचा हस्तक्षेप नसणार आहे. परिणामी नागरिकांना अधिक सुरक्षित, सोपी व पारदर्शक सेवा मिळेल.

Satbara Utara on WhatsApp
सोसायटीतील फ्लॅटचाही आता सातबारा, फ्लॅट मालकांसाठी खूशखबर, फ्लॅटसाठी आता 'व्हर्टिकल सातबारा’?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com