साताऱ्याचे जवान विपुल इंगवले यांना उपचारादरम्यान वीरमरण

हॉस्पिटल मध्ये मागील एक वर्षापासून सुरू जवान इंगवले यांच्यावर उपचार सुरू होते.मात्र, उपचारादरम्यान जवान इंगवले यांची प्राणज्योत मालवली.
vipul ingawale
vipul ingawale Saam Tv
Published On

सातारा : सियाचीन (Siachen Glacier) येथे -39°सेल्सिअसमध्ये ऑपरेशन मेघदुत हे बजावत असताना जवान विपुल इंगवले यांची तब्येत बिघडली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुणे येथील कमांड हॉस्पिटल मध्ये मागील एक वर्षापासून सुरू जवान इंगवले यांच्यावर उपचार सुरू होते.मात्र, उपचारादरम्यान जवान इंगवले यांची प्राणज्योत मालवली. जवान विपुल इंगवले यांच्या निधनाची वार्ता कळताच त्यांचा गावात शोककळा पसरली आहे. ( Satara News In Marathi )

हे देखील पाहा -

विपुल इंगवले यांचे गाव सातारा (Satara) जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील भोसे गाव आहे. जवान हे २०१६ साली भारतीय सैन्यात भरती झाले होते. जवान विपुल सियाचीन येथे -39°सेल्सिअसमध्ये ऑपरेशन मेघदुत हे बजावत होते. मात्र कर्तव्य बजावत असताना त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले.

vipul ingawale
Uttarkashi Bus Accident: उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळली; २५ जणांचा मृत्यू

दरम्यान, पुणे येथील कमांड हॉस्पिटल मध्ये मागील एक वर्षापासून विपुल यांच्यावर उपचार सुरू होते. आज उपचारादरम्यान कमांड हॉस्पिटलमध्ये जवान विपुल यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. उद्या १० वाजता शहीद विपुल यांचे पार्थिव भोसे गावात दाखल होणार आहे. उद्या त्यांच्यावर गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com