Shivendraraje यांना Udayanraje Bhosale यांचा इशारा... वाकड्या नजरेने बघू नका ! (पाहा व्हिडिओ)

खासदार उदयनराजे भाेसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आराेपप्रत्याराेप सुरु आहेत.
Shivendraraje Bhosale , Udayanraje Bhosale, Satara, Satara Political News. Parli,
Shivendraraje Bhosale , Udayanraje Bhosale, Satara, Satara Political News. Parli,saam tv file photo

Udayanraje Bhosale Latest News : जे लोक तंबी देण्याचं काम करत आहेत, जर तुम्हाला तुमचं हित कळत असेल तर वाकड्या नजरेने बघू नका असा खणखणीत इशारा खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (shivendraraje bhosale) यांचा नामाेल्लेख टाळत परळी भागातील सर्वच विराेधकांना रविवारी दिला. उदयनराजेंनी नुकताच परळी दाैरा केला. त्यावेळी कार्यकर्त्यांना संबाेधित करताना त्यांनी मनाेमिलन केल्याची चूक झाल्याचेही म्हटलं. (Breaking Marathi News)

Shivendraraje Bhosale , Udayanraje Bhosale, Satara, Satara Political News. Parli,
Satej Patil News : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला महाडिक भ्याले... सतेज पाटलांचा घणाघात

खासदार उदयनराजे भोसले यांची आंबळे येथे सभा पार पडली. या सभेत उदयनराजे म्हणाले जे लोक तंबी देण्याचं काम करत आहेत जर तुम्हाला तुमचं हित कळत असेल तर वाकड्या नजरेने बघू नका. काही लोकांना असं वाटतं की हा भाग हा परिसर म्हणजे माझा आहे. मला हसु येते असे म्हणत साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुध्दा मनात कधी असं मनात आले नसेल की हे माझं, ते माझं.

Shivendraraje Bhosale , Udayanraje Bhosale, Satara, Satara Political News. Parli,
NCP Corporator Son Arrested: NCP नगरसेवकाच्या मुलास अटक; कोट्यावधींच्या भ्रष्टाचाराचा ठपका

छत्रपती शिवाजी महाराज नेहमी म्हणायचे समाजामुळे मी आहे , माझ्यामुळे समाज नाही असं म्हणत नाव न घेता उदयनराजे यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी एक चुक झाली 2012 साली की मी प्रचाराला गेलो, मनोमिलन होते असे सांगत. स्वार्थ साधला गेला की काही लोक जसा सरडा रंग बदलतो तशी काही लोकांची खासियत असते असंही उदयनराजेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com