Police Warning : ३१ डिसेंबरला बारबालांना नाचवल्यास हॉटेलचं लायसन्स रद्द होणार

Satara Police Warning : साताऱ्यातील कास पठारातील हॉटेल मालकांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. या भागात ३१ डिसेंबरला बारबालांना नाचवल्यास हॉटेलचं लायसन्स रद्द होणार आहे.
३१ डिसेंबरला बारबालांना नाचवल्यास हॉटेलचं लायसन्स रद्द होणार
Police Warning Saam tv
Published On

सातारा : गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यातील कास पठार बारबालांच्या नाचगाण्यावरून चर्चेत आहे. या बारबालांच्या नाचगाण्यावरून तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे चांगलेच आक्रमक झाले आहेत. शांतता प्रिय मानला जाणारा सातारा गेल्या काही दिवसांपासून बारबालांच्या आणि काही हॉटेल मालकांमुळे बदनाम होऊ लागला आहे. यामुळे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

साताऱ्यातील कास पठार भागात वर्ष अखेरीस म्हणजे ३१ डिसेंबरला मोठ्या प्रमाणात पार्टींचं आयोजन केलं जातं. या अनुषंगाने सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीतील कास पठारातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार रिसॉर्ट, फार्म हाऊस ,चायनीज सेंटर, पान टपरी चालक-मालक यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. यात पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी खणखणीत इशारा दिला आहे.

३१ डिसेंबरला बारबालांना नाचवल्यास हॉटेलचं लायसन्स रद्द होणार
Satara News : साताऱ्याच्या रेव्ह पार्टीचा व्हिडिओ आणि तो राडा..| VIDEO

साताऱ्यातील कास पठारादरम्यान पडणाऱ्या घाटामध्ये उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्यांवर आजपासूनच कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीक्षक यांनी दिल्या. ३१ डिसेंबर रोजी कोणत्याही नृत्यांगना बारबाला यांना मनोरंजन करण्यासाठी बोलावून पार्टीचे तसेच आयोजन करू नये. पोलिसांच्या सूचनेचे पालन करावे अन्यथा हॉटेल, ढाबा, रेस्टॉरंट, बार, रिसॉर्ट, फार्म हाऊस, चायनीज सेंटर, पान टपरी यांचे लायसन रद्द करू, असा खणखणीत इशारा पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी दिला आहे.

३१ डिसेंबरला बारबालांना नाचवल्यास हॉटेलचं लायसन्स रद्द होणार
Viral Video: २ सेकंदासाठी नजर हटली, चिमुकला धावत रस्त्यावर गेला, मग...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

काय आहे नेमकं प्रकरण?

काही दिवसांपूर्वी साताऱ्यातील कास पठार परिसरात एका हॉटेलवर रेव्ह पार्टी झाली. या रेव्ह पार्टीत बारबाला नाचवण्यात आल्या. या पार्टीत दारू पिऊन धिंगाणा घालतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या रेव्ह पार्टीनंतर या ठिकाणी वाद होऊन राडा झाला होता. या घटनेत दोन ते तीन जण जखमी झाले होते.

या प्रकरानंतर पोलिसांनी कारवाई केली होती. या प्रकरणात कोणत्याही पोलिस बंदोबस्तात ही रेव्हपार्टी झाली नसल्याचे सांगत या प्रकरणाचा अहवाल लवकरात लवकर तयार करून दोषींवर कडक कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं.

३१ डिसेंबरला बारबालांना नाचवल्यास हॉटेलचं लायसन्स रद्द होणार
Pushpa 2 : अल्लू अर्जून नव्हे तर, पुष्पाची श्रीवल्ली गोविंदाला म्हणाली 'सामी'; दोघांचा जबरदस्त डान्स होतोय VIRAL

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com