Jayant Patil: लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रच होणार? जयंत पाटील यांच्या वक्तव्याने रंगल्या चर्चा; म्हणाले...

Maharashtra Politics: लोकसभा तसेच विधानसभा निवडणूका एकत्रच होऊ शकतात, असे मोठे विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. कोरेगावमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते.
Jayant Patil News
Jayant Patil NewsJayant Patil News

Satara News:

राजकीय वर्तुळात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लवकरच लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. अशातच आता लोकसभा तसेच विधानसभा निवडणूका एकत्र होऊ शकतात असे मोठे विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) दृष्टीने राष्ट्रवादी शरद पवार गट मैदानात उतरला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सध्या राष्ट्रवादी विजय निश्चय मेळाव्यासाठी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी कोरेगावमध्ये जयंत पाटील यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी आगामी निवडणूकांबाबत मोठे विधान केले आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?

"आगामी निवडणुकांसाठी सर्वांनी प्रयत्न करा. लोकसभेबरोबर विधानसभा जाहीर झाली तरी आश्चर्य वाटून घेऊ नका. ढिल्यात राहू नका. आपल्याकडे फक्त एक महिन्याचा वेळ आहे. एका महिन्यात काय जुगाड जुळणी करायची असेल ती करा. जागरुक राहा. लोकसभा आणि विधानसभा एकत्र लागल्या तरी आपली तयारी पाहिजे, त्यादृष्टीने कामाला लागा," असे जयंत पाटील (Jayant Patil) यावेळी म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jayant Patil News
Jalgaon News : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री विरोधात निदर्शने; जळगावात ठाकरे गट युवा सेना आक्रमक

तसेच "देशात सध्या जातीजातीमध्ये भांडण लावायचं काम चालू आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यावर सरकारचे एकमत नाहीये. शशिकांत शिंदे यांना सांगितलं आहे आधी लगीन कोंढाण्याचं. त्यानंतर आम्ही तुमच्या चिरंजीवांच्या लग्नासाठी राबायला तयार आहे," अशी मिश्किल टिप्पणीही जयंत पाटील यांनी केली. (Latest Marathi News)

Jayant Patil News
Gor Sena Morcha : गोर सेनेचा पहूरमध्ये माेर्चा, आंदाेलकांनी फाेडल्या वाहनांच्या काचा; पाेलिसांनी कुमक वाढवली

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com