Maharashtra Politics: अ‍ॅम्बुलन्स, मोबाईलनंतर आता साडी घोटाळा; विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर गंभीर आरोप

Maharashtra Politics News: राज्यात आठ हजार कोटींचा अ‍ॅम्बुलन्स घोटाळा गाजत असताना सरकारने मोबाईल घोटाळा केला. अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना सरकार 100 कोटींच्या साड्या वाटणार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam Digital
Published On

Maharashtra Politics

महायुती सरकारची भूक दिवसेंदिवस वाढत आहे. सत्तेसाठी पैसा आणि पैशातून सत्ता हे या सरकारचे ब्रिद आहे. राज्यात आठ हजार कोटींचा अ‍ॅम्बुलन्स घोटाळा गाजत असताना सरकारने मोबाईल घोटाळा केला. मर्जीतल्या कंपनीकडून 155 कोटी रुपयांची मोबाईल खरेदी करण्याचा सरकारचा इरादा आहे. त्याचबरोबर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतं मिळवण्यासाठी अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना सरकार साड्या वाटणार आहे. हा घोटाळा देखील 100 कोटींच्यावर आहे. या दोन्ही घोटाळ्यातील वाटा मंत्री आणि सरकारला मिळणार असल्याचा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

अंगणवाडी सेविकांना मोबाईल द्यायचा असेल तर सरकारने अंगणवाडी सेविकांच्या खात्यात थेट पैसे जमा करावेत. अंगणवाडी सेविकांना हवा तो मोबाईल घेण्याची मुभा द्यावी. मग भ्रष्टाचार होणार नाही. अंगणवाडी सेविका प्रामाणिक आहेत. त्यांच्यावर सरकारचा विश्वास नाही का? असा सवाल करताना त्यांनी, पैसे खाण्यासाठी अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्याची शक्कल सरकारने लढवल्याचा आरोप केला आहे.

सरकार दिल्लीतील मर्जीतील कंपनीचा खिसा भरणार आहे. महिला बाल विकास विभाग १५५ कोटी रुपयांचा चुना लावणार आहे. हा घोटाळा सरकारने वेळीच थांबवावा, दिल्लीची ही कंपनी कुणाच्या जवळची आहे याची चौकशी करावी. अंगणवाडी सेविकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत.अँम्बुलन्स, मोबाईल घोटाळ्यानंतर आता सरकारने साडी घोटाळा केला आहे. अंत्योदय शिधापत्रिका धारक प्रत्येक कुटुंबाला महायुती सरकार एक साडी देणार आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार मतं मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.

Maharashtra Politics
Chandrakant Patil: टाळी एका हाताने वाजत नाही; भाजप आमदार गोळीबार प्रकरणी चंद्रकांत पाटीलांचं मोठं वक्तव्य

राज्यातील महिला असुरक्षित आहेत. तरुणी, महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. गावगुंडांचा, नराधमांचा, रोड रोमियोंचा त्रास सुरूच आहे. महिला सक्षमीकरणात सरकार अपयशी आहे. महिलांना रोजगार मिळत नाही. तरी देखील सरकार दुर्लक्ष करत आहे. सरकार 25 लाख साड्या खरेदी करणार आहे. सरकारचा हा दिखावा आहे. खरतर सरकारकडून 1 कोटी साड्या खरेदी होणार असल्याची आमची माहिती आहे. सरकारने हे या साड्या खरेदीचे पैसे महिला सुरक्षेसाठी खर्च करावेत. या सरकाची पत एवढी खाली आली आहे की, यांना निवडणुकीसाठी साड्या वाटण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात श्री.वडेट्टीवार यांनी सरकारचे वाभाडे काढले.

Maharashtra Politics
RTO च्या कामात 'सारथी'चे विघ्न, नागरिकांना मनस्ताप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com