Karad Food Poisoning: मोठी बातमी! यात्रेच्या जेवणातून २३ जणांना विषबाधा; एकाचा मृत्यू

Satara Food Poisoning News: घटनेनंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी गावांमध्ये धाव घेतली आहे.
Satara Food Poisoning
Satara Food PoisoningSaamtv
Published On: 

Vahagaon Food Poisoning: साताऱ्याच्या कराड तालुक्यात यात्रेच्या मांसाहारी जेवणातून 23 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एक जणाचा मृत्यू झाला आहे. सध्या उर्वरित सात जणांवर कराडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Satara Latest News)

Satara Food Poisoning
Ram Shinde Death Threat: आमदार राम शिंदेंना घरात घुसून मारण्याची धमकी; पुण्यातील तरुणाला उत्तरप्रदेशमधून अटक

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, कराड तालुक्यातील वहागाव येथे ९ जून रोजी धार्मिक कार्यक्रम होता. यानिमित्ताने जेवणाचा बेत करण्यात आलेला. गावातील व बाहेरील असे मिळून एकूण ३५ जणांनी येथील जेवण केले होते. मात्र, त्यातील २४ लोकांना जेवणानंतर उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला.

त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले. यामधील अनेकांची प्रकृती चांगली होऊ लागली आहे. तर एकास जास्त त्रास होत असल्याने कऱ्हाडमधीलच खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला. (Satara News)

Satara Food Poisoning
प्रसिद्ध कोरियन अभिनेत्री Park Soo-Ryun चं अपघातात निधन, चाहत्यांना मोठा धक्का

दरम्यान, घटनेनंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी गावांमध्ये धाव घेतली आहे. घटनास्थळावरुन भाकरी, तांदूळ आदीचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. तर संबंधित घरातील ५ लोकांचे स्टुल सॅम्पल आणि पाणी नमुने घेऊन जैविक तपासणीसाठी ते जिल्हा प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com