सातारा : सातारा विभागातील एका गावातील ७ वर्षीय चिमुरडीचा मृतदेह काल रात्रीच्या सुमारास गावातीलच एका ओघळीमध्ये आढळून आला आहे. बलात्कार (abuse) करून तिचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी (police) वर्तवला असून याप्रकरणी संतोष चंद्रु थोरात (रा. सुतारवाडी, रुवले, ता. पाटण (Patan) या संशयिताला पोलिसांनी (Police) अटक केली आहे.
हे देखील पहा-
याबाबतची मिळाली माहिती अशी की, संबंधित ७ वर्षीय बालिका दुसरीच्या वर्गात शिकत होती. काल दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ती बाहेर खेळायला गेली होती. मात्र, उशिरापर्यंत घराकडे परतली नाही. गिरणीतून दळण घेवून घराकडे आलेल्या आजीच्या लक्षात हा प्रकार आल्यावर शोधाशोध करण्यात आली. मात्र, ठावठिकाणा न लागल्यामुळे पोलिसांना कळविण्यात आले आहे. सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देवून कसून तपास सुरू केला.
एकावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेवून त्याची कसून चौकशी कारणात आली, या प्रकरणाचा उलगडा झाला. संतोष चंद्रु थोरात असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस त्या मुलीच्या मृतदेहापर्यंत पोहचले. संशयिताने बलात्कार करून तिचा गळा आवळून खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक रणजित पाटील (Ranjit Patil) यांनी भेट देवून तपासकामी पोलिसांना सूचना दिले आहेत. कऱ्हाड (Karhad) येथील उपजिल्हा रुग्णालयात (hospital) मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.