Satara News : सातारा सिंचन मंडळाची दमदार कामगिरी, 22 कोटी 88 लाखांची पाणीपट्टी वसूल

या मंडळांतर्गत सर्व विभागांतील कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता, दप्तर कारकून, मोजणीदार सिंचन व्यवस्थापनातील क्षेत्रीय कर्मचारी यांचे नाईक यांनी अभिनंदन केले.
satara irrigation department collected 22 crore 88 lakhs rupees tax
satara irrigation department collected 22 crore 88 lakhs rupees taxsaam tv

Satara :

सातारा सिंचन मंडळाने 2023-2024 मध्ये टंचाई परिस्थिती असतानाही विक्रमी 22 कोटी 88 लाख रुपये एवढी पाणीपट्टी वसुली केली आहे. या मंडळामार्फत यापूर्वी 19 कोटी 41 लाख रुपये इतकी महत्तम पाणीपट्टी वसुली करण्यात आली होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सातारा जिल्ह्यातील पूर्ण झालेल्या सिंचन प्रकल्पांच्या सिंचन व्यवस्थापनाचे व देखभाल-दुरुस्तीची कामे सिंचन मंडळ करते. या मंडळाकडे धोम, धोमबलकवडी, कण्हेर, उरमोडी व कोयना हे 5 मोठे प्रकल्प, येरळवाडी, राणंद, नेर व आंधळी हे 4 मध्यम प्रकल्प व 28 लघु प्रकल्प आणि 64 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे सिंचन व्यवस्थापनासाठी आहेत.

satara irrigation department collected 22 crore 88 lakhs rupees tax
Kolhapur Crime News : शीर नसलेला मृतदेह आढळल्याने कोल्हापुरात खळबळ

या विक्रमी पाणीपट्टी वसुलीनंतर सातारा सिंचन मंडळ अधीक्षक अभियंता अरुण नाईक यांनी लाभक्षेत्रातील बागायतदार, कालवा पाणी वापर संस्था, सहकारी साखर कारखाने, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, वाई, सातारा, तासवडे (कराड), व लघु औद्योगिक वसाहत पाटण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सातारा, नगरपरिषद सातारा, वाई, पाटण व रहिमतपूर यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाल्याचे नमूद केले. (Maharashtra News)

या मंडळांतर्गत सर्व विभागांतील कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता, दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक व सिंचन व्यवस्थापनातील क्षेत्रीय कर्मचारी यांनी उद्धीष्टपूर्तीच्या पलीकडे काम केल्याने त्यांचे नाईक यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

Edited By : Siddharth Latkar

satara irrigation department collected 22 crore 88 lakhs rupees tax
Ramdas Athawale: नवीन मित्र आला म्हणून जुन्या मित्राला विसरू नका; रामदास आठवलेंचा भाजपवर राेख

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com