टीव्ही बंद केल्याच्या कारणावरुन मुलाकडून वडिलांची हत्या; साताऱ्यातील खळबळजनक घटना

घरात सुरू असलेला टिव्ही बंद केल्याच्या कारणावरून पत्नी व मुलाने वडिलांना कळकाच्या काठीने आणि लाथाबुक्यांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
satara crime news
satara crime news saam tv
Published On

Satara crime News : साताऱ्यातील (Satara) माण तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात सुरू असलेला टिव्ही बंद केल्याच्या कारणावरून पत्नी व मुलाने वडिलांना कळकाच्या काठीने आणि लाथाबुक्यांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. माण तालुक्यातील दिवड गावात सदर घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

satara crime news
आईच्‍या कारनाम्‍याचा मुलीनेच केला भांडाफोड; नेमके काय आहे प्रकरण

म्हसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवड येथील किसन नारायण सावंत हे आपल्या कुटुंबासह राहत होते. एक नोव्हेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास किसन सावंत बाहेरून घरी आले. तर मुलगा व बायको मोबाईल पाहत होते. मात्र, घरातील टीव्ही तसाच चालू होता. तो कोणीही पाहत नाही म्हटल्यावर त्यांनी बंद केला. (Satara Crime)

satara crime news
धक्कादायक! लॉजवर बोलावणाऱ्या तरुणाचे महिलेने कापले लिंग; पुण्यातल्या विचित्र घटनेने खळबळ

नेमकं काय घडलं?

टीव्ही बंद केल्यामुळे पत्नी उषा किसन सावंत , मोठा मुलगा आदित्य किसन सावंत यांचा पारा चढला. त्या दोघांनी आपआपसात संगनमत करून घरातील कळकाची दांडकी घेऊन त्यांना मारहाण केली. दोघांनी किसन यांच्या डोक्यात, अंगावर, छातीवर, पोटावर लाथाबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत किसन सावंत गंभीर जखमी झाले.

या मारहाणीत गंभीर जखमी झाल्यामुळे किसन सावंत यांना त्यांच्या नातेवाईकांनी प्रथम पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुणे येथील ससून हॉस्पिटल या ठिकाणी उपचारास नेले. उपचार सुरू असतानाच शनिवारी त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मृताच्या बहिणीने म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com