आईच्‍या कारनाम्‍याचा मुलीनेच केला भांडाफोड; नेमके काय आहे प्रकरण

आईच्‍या कारनाम्‍याचा मुलीनेच केला भांडाफोड; नेमके काय आहे प्रकरण
Crime Fraud Case
Crime Fraud CaseSaam tv

सिद्धेश म्‍हात्रे

नवी मुंबई : कोरोना काळात 2020 साली झालेल्या ऑनलाईन एलएलबीच्या परीक्षेत दुसऱ्यामार्फत परीक्षा (Exam) देऊन पास झालेल्या आई विरोधात मुलीनेच तक्रार दाखल केली आहे. अर्थात मुलीनेच आईच्या खोट्या (Fraud) एलएलबी पदवीचा भांडाफोड केल्याचे प्रकरण समोर आले आहे. (Maharashtra News)

Crime Fraud Case
बस चालकाची आत्‍महत्‍या; रात्री जेवण केल्‍यावर उधना बस स्थानकावर आत्महत्या

मुंबईतील (Mumbai) एका पोलीस निरीक्षकासोबत आईचे विवाहबाह्य संबंध असल्याने त्याच्या मदतीने एका वकिलाचा वापर केला. मोबाईल कॅमेरा बंद ठेऊन वकिलामार्फत काही पेपर सोडवले. तर काही पेपर नेरुळ येथे मोबाईलद्वारे देण्यात आले. सदर बाब पेश्याने (Doctor) डॉक्टर असलेल्या महिलेला खटकत होती.

अखेर मुलीकडून तक्रार दाखल

अखेर मुलीने आपल्या आई विरोधात फसवणूक करून एलएलबी डिग्री मिळवल्याची तक्रार दाखल केली. याप्रकरणी आरोपी आई विरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com