Satara Accident: मध्यरात्री अपघाताचा थरार, भरधाव ट्रकची कारला धडक; नवरा-बायकोचा जागीच मृत्यू

Truck And Car Accident In Satara: साताऱ्यामध्ये मध्यरात्री भयंकर अपघाताची घटना घडली. भरधाव ट्रकने कारला धडक दिली. या अपघातामध्ये नवरा-बायकोचा जागीच मृत्यू झाला.
Satara Accident: मध्यरात्री अपघाताचा थरार, भरधाव ट्रकची कारला धडक; नवरा-बायकोचा जागीच मृत्यू
Satara Accident Saam T
Published On
  • साताऱ्यामध्ये भीषण रस्ते अपघातात नवरा-बायकोचा मृत्यू

  • नेर फाटा येथे कार आणि ट्रकची जोरदार धडक झाली

  • दहावीत शिकणारा मुलगा वरद भोसले गंभीर जखमी

  • घरापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर ही दुर्दैवी दुर्घटना घडली

ओंकार कदम, सातारा

साताऱ्यामध्ये भीषण अपघातामध्ये नवरा-बायकोचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुण्यात इंजिनिअरिंगला शिकणाऱ्या मुलीला कॉलेजमध्ये सोडून घराकडे परत येत असताना ही घटना घडली. घरापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर हा अपघात झाला. भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये कारचा चुराडा झाला. कारमध्ये असलेल्या नवरा-बायकोचा जागीच मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी हळहळ व्यक्त केली जात आहे. सातारा पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये इंजिनिअरिंगला असलेल्या मुलीला कॉलेजमध्ये सोडून परत घरी येत असताना झालेल्या भीषण अपघातात दाम्पत्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत दहावीत शिकणारा मुलगाही गंभीर जखमी झाला. विजय बबनराव भोसले (५० वर्षे), समृद्धी विजय भोसले (४५ वर्षे) अशी अपघातामध्ये मृत्यू झालेल्या नवरा-बायकोची नावं आहेत. या अपघातामध्ये वरद विजय भोसले (१६ वर्षे) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Satara Accident: मध्यरात्री अपघाताचा थरार, भरधाव ट्रकची कारला धडक; नवरा-बायकोचा जागीच मृत्यू
Accident: अमरनाथ यात्रेला जाण्यापूर्वीच भयंकर घडलं, ५० भाविकांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली

सातारा-पंढरपूर महामार्गावर नेर फाटा येथे सोमवारी मध्यरात्री दीड वाजता हा अपघात झाला. भरधाव ट्रकने कारला धडक दिली. अवघ्या ५०० मीटर अंतरावर घर आले असताना भोसले कुटुंबीयांवर काळाने घाला घातला. अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. विजय आणि समृद्धी या दाम्पत्याची मुलगी गायत्री (१९ वर्षे) ही पुणे येथे इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. तिला कॉलेजला सोडण्यासाठी हे दाम्पत्य मुलगा वरदसह रविवारी गेले होते. तिथून ते तिघे परत घराकडे येत असताना ही घटना घडली.

Satara Accident: मध्यरात्री अपघाताचा थरार, भरधाव ट्रकची कारला धडक; नवरा-बायकोचा जागीच मृत्यू
Accident: लग्नाला जाताना काळाचा घाला, भरधाव कार तलावात कोसळली; ५ जणांचा मृत्यू

तिघेही कारने पुसेगावकडे निघाले होते. मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास नेर फाट्यावरील पेट्रोल पंपाजवळ पुसेगाव बाजूकडून साताऱ्याकडे जाणारा ट्रक आणि या कारची धडक झाली. या अपघातामध्ये भोसले दाम्पत्याचा जागेवरच मृत्यू झाला. तर मुलगा वरद हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सातारा सिव्हिलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ट्रकचालक समीर बाबू नदाफ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय भोसले हे श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळात वरिष्ठ क्लार्क म्हणून कार्यरत होते. तर त्यांची बायको समृद्धी या गृहिणी होत्या. त्यांच्या अपघाती जाण्याने पुसेगावसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Satara Accident: मध्यरात्री अपघाताचा थरार, भरधाव ट्रकची कारला धडक; नवरा-बायकोचा जागीच मृत्यू
Railway Accident : मोठी दुर्घटना टळली! धावत्या विरार-भरूच मेमू ट्रेनचं इंजिन रुळावरून घसरलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com