- सचिन बनसाेडे
Sarpanch Shashikala Pawar News : किर्तनकार इंदुरीकर महाराज (indurikar maharaj) यांच्या सासु शशिकला पवार यांनी महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (radhakrishna vikhe patil) यांच्या उपस्थितीत भाजपात (bjp) प्रवेश केला. संगमनेर तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच म्हणुन शशिकला पवार (shashikla pawar) या अपक्ष म्हणून निवडून आल्या हाेत्या. (Breaking Marathi News)
ग्रामपंचायत निवडणूकीत निळवंडे गावातून शशिकला पवार या अपक्ष सरपंच म्हणून उभ्या राहिल्या हाेत्या. पवार यांना जनतेने निवडून दिले. त्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अशा दोन्ही गटांनी निळवंडे ग्रामपंचायतीत आमची सत्ता आल्याचा दावा केला होता.
शशिकला पवार यांनी गावच्या विकासासाठी आपण निवडणूक (election) लढवल्याचे त्यांनी स्पष्ट करत दोन्ही नेत्यांशी सलोख्याचे संबंध असल्याच म्हंटले होते. दोन्ही नेत्यांनी यापुर्वी सहकार्य केले आहे. या पुढेही दोनही नेत्यांच्या सहकार्याने गावातील समस्या सोडवू असा पावित्रा त्यांनी घेतला होता. दरम्यान त्यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला. त्यावर काॅंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याने भाजपात प्रवेश करत असल्याचे शशिकला पवार यांनी स्पष्ट केले. (Maharashtra News)
निळवंडे गाव हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघातील असून शशिकला पवार यांनी भाजपात प्रवेश केल्याने थोरातांना हा मोठा धक्का मानला जात आहे. संगमनेर तालुक्यात नुकत्याच झालेल्या ३७ पैकी २५ ग्रामपंचायतीत थोरात गटाने सत्ता मिळवली.
असे असले तरी थोरातांच्या बालेकिल्ल्यात विखे पाटलांनी जोर्वे, तळेगाव दिघे, घुलेवाडी या थोरातांच्या ग्रामपंचायती खेचून आणल्या. आता निळवंडे ग्रामपंचायतीतही विखे पाटलांनी थोरातांना शह दिल्याने विखे पाटील हे वरचढ ठरले आहेत.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.