Bhandara: घरात घरगड्यांची फौज, तरीही स्वतः शेतात राबून बागायती शेतीतून साधली किमया

Sarita Funde Success Story: भंडाऱ्याच्या साकोली येथील सरिता फुंडे यांनी २१ एकर शेतात पारंपरिक पिकांना पार करून आधुनिक बागायतीचे प्रयोग केले, कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने त्यांनी शेतात कायापालट करून आर्थिक प्रगती साधली.
Bhandara
Bhandarasaam tv
Published On

भंडाऱ्याच्या साकोली येथील सरिता फुंडे यांनी २१ एकर शेतात पारंपरिक पिकांना फाटा देऊन आधुनिक बागायतीचे प्रयोग केले आहेत. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने त्यांनी शेतात कायापालट केला आणि आर्थिक प्रगती साधली. याशिवाय, सरिता फुंडे इतर महिलांना शेतीकडे वळण्याचा सल्ला देत आहेत. घरातील परिस्थिती सुधारत असताना, सरिता आपल्या शेतातील कामात मेहनत घेऊन एक आदर्श निर्माण करत आहेत.

सरिता फुंडे, भंडाऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेता सहकार महर्षी सुनील फुंडे यांच्या पत्नी, विवाहानंतर समृद्ध जीवन जगत असल्या तरी त्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा संबंध नेहमीच सामान्य लोकांशी जुळलेला आहे. बिरादरी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सदैव सामान्य नागरिकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे, आणि समाजासाठी त्यांचे योगदान अनमोल आहे.

सरिता फुंडे या शेतातील सर्व कामात स्वयंशक्तीने सहभागी होतात. शेतात भातपिकांची लागवड असो किंवा बागायती पिकांची, त्या साडीचा पदर कंबरेला खोचून स्वतः शेती करतात. रासायनिक खतांचा वापर न करता, त्या नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करतात. शेतातच गांडूळ खत आणि दशपर्णी अर्क तयार करून ते बागायती पिकांच्या संरक्षणासाठी वापरतात. त्यांच्या या पारंपरिक, पण अत्याधुनिक पद्धतीने शेती करण्याचा आदर्श इतरांसाठी प्रेरणादायी ठरतो.

सरिता फुंडे मागील ८ वर्षांपासून शेतीत सक्रिय आहेत आणि दरवर्षी लाखो रुपयांचं उत्पादन घेतात. त्या इतर महिलांना शेतीकडे वळून प्रगती साधण्याचं आवाहन करतात. शेतात फिशटॅंकमध्ये मासोळ्या, ॲपल बोर, टरबूज, टोमॅटो, फणस, चवळी, ढेमसं, कारली, केळी, लिंबू, मका आणि भातपिकांची लागवड केली आहे. याशिवाय, कमळाचे विविध रंगांचे उत्पादन आणि दुग्ध व्यवसायात त्यांनी मोठी क्रांती केली आहे. त्यांच्या या प्रयत्नांनी इतर शेतकऱ्यांना प्रेरित केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com