Santosh Deshmukh Case: सरपंच हत्या प्रकरणी मुंडेंचा पाय खोलात? मनोज जरांगेंच्या मागणीनं राजकारण तापलं, पाहा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आता त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी उचलली आहे. ही मागणी नेमकी कोणी आणि कोणत्या कारणावरून केली आहे, यावर चर्चेला उधाण आले आहे.
Santosh Deshmukh Case: सरपंच हत्या प्रकरणी मुंडेंचा पाय खोलात? मनोज जरांगेंच्या मागणीनं राजकारण तापलं, पाहा स्पेशल रिपोर्ट
Published On

धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची मागणी केल्यानंतर आता थेट त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात ही मागणी कोणी आणि का केली आहे. सरपंच हत्येशी संबंधित प्रकरणात धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आल्यानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती.

मात्र आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. धनंजय मुंडे पदाचा वापर करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत मुंडेंवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जरांगेंनी केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर सरपंच देशमुखांच्या हत्येनंतर पोलीसांनी कुणाच्या दबावामुळे आरोपींचे फोन ट्रेस केले नाहीत? असा सवाल धनंजय देशमुखांनी उपस्थित केला आहे.

Santosh Deshmukh Case: सरपंच हत्या प्रकरणी मुंडेंचा पाय खोलात? मनोज जरांगेंच्या मागणीनं राजकारण तापलं, पाहा स्पेशल रिपोर्ट
SSC-HSC Exam: ड्रोनच्या माध्यमातून दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रांवर नजर, शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 59 दिवस झाले आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यातच धनंजय मुंडेंशी संबंधित वाल्मिक कराडवर खंडणी प्रकरणी मकोका लावण्यात आला आहे. त्यामुळे मुंडेंनी नैतिकच्या आधारावर राजीनामा देण्याची मागणी केली जात होती. मात्र आता धनंजय मुंडे आरोपींना वाचवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Santosh Deshmukh Case: सरपंच हत्या प्रकरणी मुंडेंचा पाय खोलात? मनोज जरांगेंच्या मागणीनं राजकारण तापलं, पाहा स्पेशल रिपोर्ट
Mumbai Lifeline: चार लाकडी डबे असलेली मुंबईची लाइफलाइन कशी झाली? लोकलचा १०० वर्षांचा इतिहास वाचा

एवढंच नाही तर धनंजय मुंडे, त्यांचा ड्रायव्हर आणि मित्रांचे सीडीआर तपासण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. त्यावरुन मुंडेंनी संताप व्यक्त केला आहे. आधीच दमानियांच्या घोटाळ्यामुळे हैराण झालेल्या मुंडेंवर आता हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. एसआयटीचे अधिकारी धनंजय मुंडेंचे सीडीआर काढून चौकशी करणार का हा खरा सवाल आहे.

Santosh Deshmukh Case: सरपंच हत्या प्रकरणी मुंडेंचा पाय खोलात? मनोज जरांगेंच्या मागणीनं राजकारण तापलं, पाहा स्पेशल रिपोर्ट
Valentine's Week 2025: रोज डे पासून व्हॅलेंटाईन डे पर्यंत प्रेमाच्या ७ दिवसांचे महत्त्व, वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com