Walmik Karad Surrender: पोलिसांचं यश की कराडचा दबदबा? कराडच्या शरणावर विरोधकांना संशय

Santosh Deshmukh Case : सरपंच हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड पोलीसांना शरण गेला. मात्र वाल्मिक कराडची शरणागती ही पोलीसांनी नाकेबंदी केल्यामुळे आहे की आपला दबदबा कायम राखण्यासाठी? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
walmik karad
Walmik Karad Surrendersaam tv
Published On

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी संशयीत आरोपी असलेल्या वाल्मिक कराडने सलग 11 दिवस पोलीसांना गुंगारा दिला.. एवढंच नाही तर वाल्मिक कराडचं लाईव्ह लोकेशन पुणे दाखवत असतानाही कराड पोलीसांना सापडला नाही. मात्र सीआयडीने वाल्मिक कराडच्या मालमत्तांवर टाच आणली आणि वाल्मिक कराडने शरणागती पत्करली.

मात्र वाल्मिक कराडने आत्मसमर्पण केलं असलं तरी कराडच्या आत्मसमर्पणावर संतोष देशमुखांच्या मुलीने सवाल उपस्थित केलाय. सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यातील 4 जणांना अटक करण्यात आलीय.. तर कराडवर हत्येप्रकरणी नाही तर खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांकडून वाल्मिक कराडवर मकोका लावण्याची मागणी करण्यात आलीय. वाल्मिक कराडच्या शरणागतीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांकडून संशय व्यक्त केला जातोय.. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बीड प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याबाबत सर्व प्रयत्न करणार असल्याचा इशारा दिलाय..

walmik karad
Walmik Karad CID Enquiry : वाल्मिक कराडची सीआयडी चौकशी, विचारले 'हे' प्रश्न | VIDEO

तब्बल 11 दिवस वाल्मिक कराड प्रचंड कार्यक्षम अशी ओळख असलेल्या महाराष्ट्र पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र पोलीसांनी वाल्मिक कराडच्या संपत्तीवर टाच आणण्याची घेतलेली भूमिका आणि कराडच्या पत्नीची केलेली चौकशी या दबावामुळे कराड शरण आला की अटक न होता यंत्रणेवर दबदबा कायम ठेवत स्वतःच्या गाडीतून जात शरणागती पत्करली? याचीच चर्चा रंगलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com