Paithan News: संत ज्ञानेश्वर उद्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित होणार, १५० कोटीचा निधी देण्याची CM शिंदेंची घोषणा

Sant Dnyaneshwar Udyan: पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकास करावा यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
Sant Dnyaneshwar Udyan, Paithan
Sant Dnyaneshwar Udyan, PaithanSaam Tv
Published On

Sant Dnyaneshwar Udyan:

पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकास करावा यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

संत ज्ञानेश्वर उद्यान विकसित करण्याबाबत आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक झाली. यावेळी दुरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे सहभागी झाले होते तर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरव विजय, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज आदी यावेळी उपस्थित होते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sant Dnyaneshwar Udyan, Paithan
Bandra To Kurla: वांद्रे ते कुर्ला व्हाया बीकेसी धावणार पॉड टॅक्सी, मुंबईकरांनो जाणून घ्या संपूर्ण माहिती

या उद्यानाच्या विकास कामांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उच्चाधिकार समितीची बैठक झाली त्यामध्ये समितीच्या शिफारशी नुसार विकास कामांच्या प्रस्तावात सुधारणा करून १४९ कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव करण्यात आला. (Latest Marathi News)

पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणुन विकसित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यापूर्वी वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या आहेत. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत संत ज्ञानेश्वर उद्यान पुनर्विकासासाठी १५० कोटीचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली होती.

Sant Dnyaneshwar Udyan, Paithan
Lok Sabha Election: माजी न्यायाधीश गंगोपाध्याय भाजपमध्ये करणार प्रवेश, या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार

संत ज्ञानेश्वर उद्यान विकसित व सुशोभित करण्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी जागतिक स्तरावरील सल्लागार निवडीची निविदा प्रक्रिया पूर्ण करून सल्लागाराला कार्यारंभ आदेश देखील देण्यात आला आहे. यावेळी उद्यानाच्या सुशोभीकरण आणि पुनर्विकास कामांचे सादरीकरण करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com