Sanjay Raut News : महाराष्ट्रात ४ जूननंतर मोठ्या घडामोडी घडणार: संजय राऊत

Sanjay Raut : सांगलीमधील बंडखोर उमेदवार विशाल पाटील आणि शरद पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिलीय. राऊतांच्या विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडालीय.
Sanjay Raut News : महाराष्ट्रात ४ जूननंतर मोठ्या घडामोडी घडणार: संजय राऊत

सुशील थोरात

अहमदनगर: लोकसभा निवडणुकांसाठी घेतल्या जाणाऱ्या प्रचारसभेत केल्या जाणाऱ्या आरोप-प्रत्यारोपामुळे राजकारण तापलंय. याचदरम्यान निवडणुकानंतर राज्यातील राजकारणात मोठी घडामोड होणार असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. लोकसभेनंतर काँग्रेसमध्ये छोटे पक्ष विलीन होतील, असं विधान शरद पवारांनी केलं होतं. त्यामुळे संजय राऊतांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झालंय.

सांगली येथील बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यावर काँग्रेसने कोणतीच कारवाई केलेली नाहीये. यावर बोलताना राऊत म्हणाले की, आता फक्त निवडणुका पार पडल्यात. चार जूननंतर सांगलीसह महाराष्ट्रात बऱ्याच घडामोडी घडतील. लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुका होतील. तेव्हा आम्ही पाहू कोण कोणी पडद्याआडून काम केलं. हा सर्व रिपोर्ट आमच्याकडे आलाय. शिवसेना यासर्व गोष्टी गांभीर्याने घेणार असल्याचा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिलाय.

प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, या शरद पवार यांच्या विधानाचाही संजय राऊत यांनी समाचार घेतलाय. आणीबाणीच्या काळात सुद्धा इंदिरा गांधींना बाळासाहेब ठाकरे यांनी जुमानले नाहीत. ना पक्ष विलीन केला ना विसर्जित केला. कारण आमच्याकडे आत्मविश्वास आहे, जनतेचा विश्वास आहे. आमचे नेतृत्व खंबीर असल्याचं संजय राऊत म्हणालेत.

नाशिकचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांना पोलिसांनी तडीपारचे नोटीस काढलीय. यावरही राऊतांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. यावेळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिलाय. तुम्ही नोटिसा काढता आता पुढील काळात राज्याचे मुख्यमंत्री यांचीही जेलमध्ये जाण्याची वेळ येणार आहे. अमित शहा, फडणवीस, कोणीही वाचवणार नाही कारण त्यांच्यावरही अत्यंत गंभीर आरोप आहेत. ईडी त्यांनाही सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिलीय.

मोदी आता प्रथमच अदानी-अंबानी यांच्यावर बोलायला लागलेत. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले होते की, ते या देशातला काळा पैसा आणि भ्रष्टाचाराचा पैसा मी नष्ट करतील. अदानी-अंबानी यांचा काळा पैसा टेम्पोने भरभरून राहुल गांधी यांच्याकडे जात आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, नरेंद्र मोदी यांना या भ्रष्टाचाराची माहिती आहे. त्यामुळे मनी लॉन्ड्रिग कायद्याखाली मोदींनी या दोघांना अटक केली पाहिजे. ज्याप्रमाणे इतर लोकांवर कारवाई होते, त्याप्रमाणे अदानी-अंबानी यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केलीय.

Sanjay Raut News : महाराष्ट्रात ४ जूननंतर मोठ्या घडामोडी घडणार: संजय राऊत
Devendra Fadnavis: शरद पवार म्हणतील तेच उद्धव ठाकरे करतात, देवेंद्र फडणवीस यांचा खोचक टोला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com