Manoj Jarange : देवेंद्र फडणवीसांचे संजय राऊतांनी केलं कौतुक, शिंदे-पवारांवर साधला निशाणा

Sanjay Raut on devendra Fadnavis : संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचे संयम आणि नेतृत्वाचे कौतुक केले. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.
devendra Fadnavis
devendra Fadnavis saam tv
Published On
Summary
  • संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.

  • शिंदे व अजित पवार यांच्यावर उपस्थित राहिले नाहीत म्हणून टीका केली.

  • मराठा आरक्षण आंदोलनात फडणवीस अग्रभागी होते, असे राऊतांचे मत.

  • महाराष्ट्रात नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Sanjay Raut on devendra Fadnavis : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मराठा आरक्षणावरून देवेंद्र पडणवीस यांचे कौतुक केले. टीका झाल्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांनी संयम सोडला नाही, असे संजय राऊत म्हणाले. त्याशिवाय त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलानावेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार कुठे होते? वाशीमध्ये छत्रपतींची शपथ घेतली होती, आता शिंदे कुठे गेले? असा सवाल उपस्थित केला. मराठा आरक्षणाच्या घडामोडींवरून संजय राऊत यांनी मोठा सवाल उपस्थित केला आहे.

“कालच्या प्रसंगात दोन्ही उपमुख्यमंत्री कुठे होते?” असे राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी फडणवीस यांचे कौतुक केले. त्यांच्या प्रतिक्रियेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा बांधवांनी मुंबईत मोठे आंदोलन झाले. काल सरकारने मागण्या मान्य केल्या, जर जरांगे व आंदोलक समाधानी आहेत तर आम्हीही समाधानी आहोत. नवी मुंबईतही त्यांनी गुलाल उधळला होता. आता मुंबईतील गुलालात व नवी मुंबईच्या गुलालात काय फरक आहे ते बघावं लागेल. जरांगे पाटील यांनी फडणवीस यांचे आभार मानले, ही चांगली गोष्ट आहे. सरकारचेही आम्ही अभिनंदन करतो, असे संजय राऊत म्हणाले.

devendra Fadnavis
Ganpati Visarjan : पुण्यात गणेश विसर्जनाला गालबोट, मुळशीमध्ये युवक बुडाला

कालच्या प्रसंगात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री कुठे होते? एकनाथ शिंदे गुलाल उधळायला नवी मुंबईत होते, पण काल ते दिसले नाहीत. याचे कारण काय? मुंबईत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी राहणं गरजेचे होते सर्वांनी..कालचे संपूर्ण श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांचे आहे. ते या चर्चेत होते, सूचना देत होते. पण अजित पवार व एकनाथ शिंदे कुठे होते. ते आनंद सोहळ्यात का नव्हते. हे प्रकरण चिघळत राहावे आणि मुख्यमंत्री अडचणीत यावेत म्हणून काही करत होते का, हे काल प्रकर्षाने जाणवले, असे राऊत म्हणाले.

उपोषण नक्की संपले पण आंदोलन संपलेले नाही. अशा प्रकारचा निर्णय घेण्याशिवाय फडणवीस यांच्यापुढं दुसरा पर्याय नव्हता. हायकोर्टाच्या आदेशानंतर त्यांना निर्णय घ्यावा लागला, असे राऊत म्हणाले.

devendra Fadnavis
Manoj Jarange : लेकराला पुन्हा उपोषण करायला लावू नका, जरांगेंच्या मातोश्रींना अश्रू अनावर, सरकारला कळकळीची विनंती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com