Sanjay Raut: सांगलीची जागा महाविकास आघाडीची, चंद्रहार पाटील हेच उमेदवार; संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
विजय पाटील साम टीव्ही, सांगली
Sanjay Raut News
मैत्रीपूर्ण हा घातक शब्द आहे. अख्या महाराष्ट्रत हा प्रयोग होऊ शकतो, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. सांगलीमधून भाजपाचा उमेदवार निवडून जात नाही. जागा महाविकास आघाडीची (Sanjay Raut On Chandrahar Patil) आहे. चंद्रहार पाटील हेच उमेदवार आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. (Maharashtra Lok sabha Election)
काँग्रेस हायकमांडशी बोलणं झालं आहे. यामुळे चंद्रहार पाटील हेच उमेदवार असतील. शेवटपर्यंत आघाडीमध्ये पेच आहे, पण एकमेकांशी चर्चा करून तो सोडवला जाईल. काही ठिकाणी शिवसेना, काही ठिकाणी काँग्रेस लढण्यासाठी आग्रही आहे. पण वरिष्ठ पातळीवरून कार्यकर्त्यांना सांगायचं असतं, असं संजय राऊत म्हणाले (Sanjay Raut News) आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यावेळी माध्यमांशी बोलताना ते (Sanjay Raut Statement) म्हणाले की, फ्रेंडली फाईटबाबत बोलणारे अनिस अहमद कोण ? फ्रेंडली फाईट हा घातक शब्द आहे. मग सगळीकडे फ्रेंडली फाईट होईल. नाना पाटोले बोलत असतील तर चांगली गोष्ट आहे, अस राऊतांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, गिरीष महाजन जळगाव वाचवा. त्यांची जागा दाखवण्यासाठी आम्ही शिवसेना उमेदवार उभा केला (Maharashtra Politics) आहे.
एकनाथ खडसे भाजपात जाणार आहेत, यावर संजय राऊत म्हणाले की, मला माहिती (Lok Sabha) नाही. पण भाजपाने त्यांच्यावर जे आरोप केले आहेत, त्याचं काय होणार ?आता त्यांच्याकडे वेगळी वाशिंग मशीन आली आहे का? असा टोलाही त्यांनी एकनाथ खडसे यांना लगावला ( Sangli Lok Sabha) आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत. संजय राऊत यांच्यासोबत हेलिकॉप्टरने चंद्रहार पाटील मुंबईला जात आहेत. शिवसेनेच्या काही उमेदवारांची (Lok Sabha Election 2024) बैठक आणि सांगली-कोल्हापूरवासीयांची बैठक असल्यामुळं चंद्रहार पाटील मुंबईला येत असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.