Sanjay Raut : आमच्यासाठी प्रत्येक उमेदवार शिवसेनेचा; जागावाटपाच्या मुद्द्यावरून संजय राऊत स्पष्टच बोलले

Sanjay Raut on Sabha Election : उद्धव ठाकरेंनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. महाविकास आघाडीचं वातावरण सर्व राज्यांमध्ये अक्षरशः झंजावत आहे. सांगलीत आमचे उमेदवार चंद्रहार पाटील हे फार आधी प्रचाराला लागलेत.
Sanjay Raut
Sanjay RautSaam TV

मयुर राणे

Lok Sabha Election 2024 :

संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही महाविकास आघाडीच्या प्रचाराला लागले आहोत. 48 जागांमध्ये आम्ही हे पाहत नाही उमेदवार शिवसेनेचा आहे, राष्ट्रवादीचा आहे किंवा काँग्रेस पक्षाचा आहे. आमच्यासाठी प्रत्येक उमेदवार शिवसेनेचा आहे, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलाय.

Sanjay Raut
Maharashtra Lok Sabha Election : दीर-भावजय धाराशिवच्या आखाड्यात आमनेसामने; पारंपरिक प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात

राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपावरून महावीकास आघाडी आणि महायुती दोन्हीमध्ये सूर जुळत नसल्याचं दिसत आहे. मात्र यावर बोलताना आमच्यासाठी प्रत्येक उमेदवार शिवसेनेचा आहे. हा महाविकास आघाडीचा आहे, इंडिया आघाडीचा आहे, अशा शब्दांत विश्वास व्यक्त केलाय.

उद्धव ठाकरेंनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. महाविकास आघाडीचं वातावरण सर्व राज्यांमध्ये अक्षरशः झंजावत आहे. सांगलीत आमचे उमेदवार चंद्रहार पाटील हे फार आधी प्रचाराला लागलेत. सांगलीच्या बाबतीत आम्ही काँग्रेससोबत चर्चा केली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार या सगळ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. पण लोकसभा निवडणूक सांगलीतून शिवसेनाच लढणार, असंही संजय राऊतांनी यावेळी म्हटलं.

रामटेक मतदार संघामध्ये देखील शिवसेना आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू होती. यावरून बोलताना राऊत म्हणाले की, रामटेक हा आमचा परंपरागत मतदार संघ आहे. आमच्या शिवसैनिकांना वाटत होतं की तो मतदारसंघ आमच्याकडे असावा. पण आम्ही त्यांची समजूत काढली आणि तो मतदार संघ काँग्रेसला दिला. छत्रपती शाहू महाराजांचा मतदारसंघ आम्ही काँग्रेसला दिला. आमच्याही कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी हट्ट होता पण आम्ही त्याची समजूत काढली.

आघाडीमध्ये काम करत असताना दुखावलेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढावी लागते. सांगलीतलं आणि राज्यातील काँग्रेसचे नेतृत्व हे त्या भागातील कार्यकर्त्यांची समजूत काढतील. सांगलीच्या बाबतीत आम्ही काँग्रेसची अनेक पर्यायांची चर्चा केलेली आहे. पण लोकसभा निवडणूक हे सांगलीत शिवसेनाच लढणार, असं राऊतांनी ठामपणे सांगितलं.

Sanjay Raut
Chalisgaon Crime : चाळीसगाव हादरले; विवाहितेची हत्या करून नदीच्या वाळूत पुरले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com