Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल अयोध्या दौऱ्यावर होते. इथे त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेत विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. अशात आता खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानाने जे गुंड नेले होते त्यांना शरयू तीरावर पवित्र करण्यासाठी घेऊन गेले होते का?, असा प्रश्न राऊतांनी विचारला आहे.
काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर टीका करताना दाउदचा उल्लेख केला होता. तसेच आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे आहोत म्हणून आम्ही वेगळं सरकार स्थापन केलं असं ते म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांच्या बाळासाहेबांवरील वक्तव्यावर राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या वडिलांबद्दल बोलावं.
बाळासाहेब ठाकरे हे गद्दारांच्या आणि बेईमानांच्या विरोधात लढत आलेले आहेत. बेईमान्यांना रस्त्यावर उतरवून त्यांचे कपडे काढून मारले पाहिजे असा बाळासाहेबांचा विचार आहे. त्यामुळे आता आम्ही त्यांच्या विचारांचा पालन करावं का?, असा खोचक प्रश्न राऊतांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
दर्शनापेक्षा शक्ती प्रदर्शनाचा विषय जास्त होता. आम्ही सुद्धा याआधी दर्शन घेतलेलं आहे. ज्या रामाची आपण पूजा केली त्या रामाने वनवासात जाताना आपला भाऊ भरत याला राज्य दिलं आणि राज्य चालवताना भरतने रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून आपला संयम आणि मर्यादा पुरुषोत्तम रामाचे विचार अमलात आणले हा विचार किती लोकांना पटतो आणि पटला आहे मला माहित नाही, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
पुढे शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित करत संजय राऊत म्हणाले की, शक्ती प्रदर्शन ठाण्याच्या नाक्यावर देखील होऊ शकते. त्यात सरकारचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे अयोध्येत आहेत. श्रद्धा असेल तर अयोध्येत जाण्यास काही हरकत नाही परंतु शक्ती प्रदर्शन करण्यासाठी ते तिथे गेले आहेत. त्यांनी आयोध्येतून शेतकऱ्यांच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत, असं ते म्हणत आहेत त्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला शून्यआने पुसू नये.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.