Sanjay Raut News: 'शिंदेंना जावच लागेल...'; देवेंद्र फडणवीसांच्या 'मी पुन्हा येईल' व्हिडीओवर संजय राऊतांचं मोठं विधान

Sanjay Raut On Eknath Shinde: शिंदे आणि अजित पवार यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाची प्रतिष्ठा धुळीस मिळालीये, असं संजय राऊत म्हणाले.
Sanjay raut, Eknath Shinde
Sanjay raut, Eknath Shinde Saam TV
Published On

Maharashtra Political News:

भाजपच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा 'मी पुन्हा येईल' असं म्हणतानाचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. देवेंद्र फडणवीसांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर ते परत एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार अशा चर्चांना उधाण आलंय. या व्हिडीओवरून खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर खरमरीत टीका केलीये.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sanjay raut, Eknath Shinde
Maharashtra Political News : मराठा आरक्षणाच्या पेचामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला?, शिंदे-फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात नेमकं काय झालं?

अजित पवारांचे मुख्यमंत्री पदाचे दरवाजे बंद

देवेंद्र फडणवीस अपात्रतेची टांगती तलवार न घेता येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे. शिंदेंना जावच लागेल आणि अजित पवारांचे मुख्यमंत्री पदाचे दरवाजे बंद झालेत. भारतीय जनता पक्षाकडून अजित पवारांना मंत्रिमंडळात घेण्यासही विरोध होता. शिंदे आणि अजित पवार यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाची प्रतिष्ठा धुळीस मिळालीये, असं संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री पदाचा शिंदेंना राजिनामा द्यावा लागेल

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून जावं लागेल आणि त्यांना राजीनामा द्यावा लागेल, असं संजय राऊतांनी म्हटलंय. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय काही काळानंतर आपल्याला मान्य करावा लगेल, असा संदेश एकनाथ शिंदेंना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडून देण्यात आलाय. मी असं जबाबदारीने सांगत असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीसांचं मी पुन्हा येईल हे विधान पुन्हा एकदा चर्चेत आलंय. त्यांच्या व्हायरल व्हिडीओमुळे पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री होतील अशा चर्चा होत आहेत. या चर्चांना उधाण आल्यानंतर भाजपने तो व्हिडीओ आपल्या ट्वीटर आकउंटवरून डीलीट केला आहे.

Sanjay raut, Eknath Shinde
Jalgaon Crime News: तरुणाला मारहाण करत सोनसाखळी लांबविली; जळगाव रेल्वेस्थानकावरील घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com