
जयश्री मोरे
Maharashtra Politics: कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार लढत सुरू आहे. ही निवडणूक बिनवीरोध व्हावी अशी भाजप आणि शिंदे गटाची इच्छा आहे. मात्र विरोधक देखील या दोन्ही जागांसाठी निवडणूक लढवण्यास आग्रही आहेत. अशात आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी एक चकित करणारं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न वाखाणण्यासारखे आहेत, असं संजय राऊत म्हणालेत. (Latest
मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न वाखाणण्यासारखे आहेत.मात्र आम्ही कसबा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणच्या पोटनिवडणुकीचे सर्व्हे केलेत. यात दोन्ही मतदारसंघातील नागरिक निवडणूक व्हावी अशी इच्छा व्यक्त करत आहेत. त्यांना स्वत:चा निर्णय द्यायचा आहे. कसबा आणी चिंचवड निवडणूक होणार. कारण ही लोकांची ईच्छा आहे. चिंचवड जागेसाठी शिवसेना इच्छुक आहे. तर कसबा काँग्रेस लढणार हे आधीच ठरलं होतं, असं संजय राऊत म्हणाले.
दोन्ही जागांमधील वातावरण भाजपला अनुकूल नाही
भाजप आणी काँग्रेसनं उमेदवार जाहीर केलेत. मात्र या दोन्ही जागांमधील वातावरण भाजपला अनुकूल नाही. विधानपरिषद निवडणुकीत ते स्पष्ट झालंय. शिक्षक आणी पदवीधर यांचा कौल हा मवीआला आहे. बिनविरोध आवाहनासाठी मुख्यमंत्र्यांचा आम्हाला एकही फोन नाही आणि येण्याची शक्यता देखील नाही, असं राऊत म्हणाले.
वातावरण चांगलं होण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी काय केलं?
पुढे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत राऊत म्हणाले की, "महाराष्ट्राचं राजकारण कोणी गढूळ केलं हे ही लक्षात घ्यायला हवं. देवेंद्र फडणवीस यांनीही हे मान्य करून वातावरण चांगलं होण्यासाठी पुढाकार घेणार असं म्हटलं होतं. पुढे तसे कोणतेही प्रयत्न का झाले नाही ?"
भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी भराडी देवीचे दर्शन घेतले आहे. यावरून राऊतांनी राणेंवर जहरी टीका केली आहे. "भराडी देवी हे जागृत देवस्थान. पापी लोकांना आशीर्वाद देत नाही. कोकणातील देव तर अधिक जागृत आहे, असं राऊत म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.