Sangola Accident: सांगोल्यात भीषण अपघात! भरधाव ट्रकने ५ महिलांना चिरडले; शेतातून घरी जाताना काळाची झडप

Pandharpur- Karad Road Accident News: शेतातून घराकडे निघालेल्या पाच महिलांना भरधाव ट्रकने चिरडल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पंढरपूर- कराड रोडवर हा भीषण अपघात झाला.
Sangola Accident: सांगोल्यात भीषण अपघात! भरधाव ट्रकने ५ महिलांना चिरडले; शेतातून घरी जाताना काळाजी झडप
Sangola Accident NewsSaam Tv

सांगोला, ता. १८ जून २०२४

सांगोल्यामधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. सांगोला तालुक्यातील पंढरपूर कराड मार्गावर भरधाव ट्रकने पाच महिलांना चिरडल्याची घटना घडली. शेतातून काम करून घराकडे जाताना हा भयंकर अपघात झाला.

Sangola Accident: सांगोल्यात भीषण अपघात! भरधाव ट्रकने ५ महिलांना चिरडले; शेतातून घरी जाताना काळाजी झडप
Laxman Hake VIDEO : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची प्रकृती खालावली, शुगर आणि पाणी झालं कमी; उपचार नाकारले!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सांगोला तालुक्यातील चिकमहुद येथील बंडगरवाडी येथे एका आयशरने सात मजूर महिलांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. यापैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. आज दुपारी चार वाजता हा भीषण अपघात झाला.

कटफळ येथील काही महिला चिकमहुद येथील बंडगरवाडी येथे कामावरून सुटल्यानंतर वाहनाची वाट पाहत उभ्या होत्या. याच वेळी कोळसा वाहतूक करणारा एक आयशर समोरून आला. आयशर ड्रायव्हरचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने थेट या सातही महिलांना चिरडले. या सर्व महीला या कटफळ येथील रहिवासी आहेत.

Sangola Accident: सांगोल्यात भीषण अपघात! भरधाव ट्रकने ५ महिलांना चिरडले; शेतातून घरी जाताना काळाजी झडप
Chhatrapati Sambhajinagar: शेतकऱ्यांनो सावधान! कीटकनाशक फवारताना विषबाधा होऊन तरुणाचा मृत्यू; कशी घ्याल काळजी?

हा अपघात इतका भीषण होता की पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला तर दोघी गंभीर जखमी झाल्यात. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, तसेच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात झालेल्या आयशर मध्ये दोघेजण होते, त्यातील एक जण पळून गेला आहे तर एकाला पकडण्यात पोलिसाला यश आले. या भयंकर अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Sangola Accident: सांगोल्यात भीषण अपघात! भरधाव ट्रकने ५ महिलांना चिरडले; शेतातून घरी जाताना काळाजी झडप
Pune News : पुण्यातील १३ लाख फॉलोअर्स असलेली 'ती' बेपत्ता रिलस्टार अखेर सापडली; इतके दिवस नेमकी कुठे होती?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com