शरद पवारांच्या समर्थकाची कार फोडली, घरावर दगडफेक, आमदार पडळकरांच्या कार्यकर्त्यांवर आरोप

Sangli political clash : सांगलीतील विटा येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सरचिटणीस महेश कुपाडे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांवर कार्यालय, गाडी आणि घरावर हल्ला केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
Sangli Vita political controversy
Sangli Vita political controversy
Published On

विजय पाटील, सांगली प्रतिनिधी

Sangli Vita political controversy latest news : सांगलीत राजकीय वाद उफाळला असून विट्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्याला टार्गेट करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यालयाची, गाडीची तोडफोड केली असून घरावरही दगडफेक केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शरद पवार पक्षाचे सरचिटणीस महेश कुपाडे यांनी आमदार पडळकर यांच्या कार्यकर्त्यांवर आरोप केलाय. (Mahesh Kupade attack allegations, Gopichand Padalkar supporters vandalism case)

मोबाईल स्टेटसच्या वादातून पडळकर समर्थकांनी आधी फोनवरून धमक्या दिल्या आणि त्यानंतर हा हल्ला केल्याचं कुपाडे यांचं म्हणणं आहे. या घटनेमुळे विटा शहरात खळबळ उडाली आहे. कुपाडे यांनी विटा पोलीस ठाण्यात या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल केला आहे. तसंच संबंधित गुंडांवर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. सांगलीच्या विटामध्ये पुन्हा एकदा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

Sangli Vita political controversy
Pune Gangwar : पुण्यात पुन्हा गँगवॉर! आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावाची निर्घृण हत्या; बस स्टँडवरच गोळ्या झाडल्या अन् कोयत्याने वार

कार्यालयाची, गाडीची तोडफोड केली असून घरावरही दगडफेक केल्याचा गंभीर आरोप शरद पवार पक्षाचे सरचिटणीस महेश कुपाडे यांनी केला. या प्रकरणी विटा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही अन् लोकांचा जबाब घेण्यास सुरूवात केली आहे. या प्रकरणात आरोपींवर काय कारवाई होणार? याकडे विटामधील नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे.

Sangli Vita political controversy
Modi Meloni Video : पंतप्रधान मोदींनी मेलोनींना दिली 'गोड' भेट; व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या, 'मेलोडी...'
Sangli Vita political controversy
Shocking : माणुसकीला काळिमा! ५ वर्षांच्या दिव्यांग मुलाची निर्घृण हत्या, आई वडील फरार; धक्कादायक कारण समोर

विटा येथे आमदार जयंत पाटील यांचे समर्थक आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र वाद झाल्याची घटना घडली आहे. या वादातून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी, जयंत पाटील यांचे समर्थक असलेले महेश कुपाडे आणि अमृता कुपाडे यांचे ट्रॅव्हल्स बुकिंगचे कार्यालय फोडल्याचा आरोप करण्यात येत आहे. सोशल मीडियावर एक विशिष्ट स्टेटस का ठेवले? असा जाब विचारत पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी कुपाडे यांना धारेवर धरले. महेश कुपाडे यांनी आमदार पडळकर यांची माफी मागण्यास नकार दिल्यामुळेच चिडलेल्या कार्यकर्त्यांनी येऊन हे ऑफिस फोडल्याचा आरोप होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com