Sangli News : जेवणाच्या दर्जावरुन विद्यार्थी भडकले, सांगलीत शासकीय वस्तीगृहात अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ

वस्तीगृहाचे अधीक्षक यांनी जेवणाचा दर्जा तपासून पाहून ठेका रद्द करण्याची मागणी प्रशासनाला करु असे साम टीव्हीशी बाेलताना स्पष्ट केले.
Sangli Breaking News
Sangli Breaking Newssaam tv
Published On

Sangli News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तीगृहात निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याने मुलांनी वस्तीगृह बाहेर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. यावेळी मुलांनी हातात ताट घेऊन जेवण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशी घोषणाबाजी केली. (Maharashtra News)

Sangli Breaking News
Ambabai Mandir: अंबाबाई मंदिरात चित्रणास जिल्हाधिकाऱ्यांनी घातली बंदी; नव्या आदेशाने कोल्हापुरात नाराजीचा सूर

सांगली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृहात गेल्या अनेक महिन्यापासून निकृष्ट दर्जाचे जेवण ठेकेदार पुरवत असल्याची तक्रार मुलांची आहे. त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने आज (शनिवार) मुलांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.

विशेष म्हणजे आजचे आंदाेलन मुलांनी हे अन्नत्याग करुन केले आहे. यावेळी मुलांनी भोजन ठेका बदलून दिला पाहिजे. शैक्षणिक खर्च आणि निर्वाह भत्ता तात्काळ मिळालाच पाहिजे अशा मागण्या देखील केल्या आहेत.

दरम्यान वस्तीगृहाचे अधीक्षक यांनी जेवणाचा दर्जा तपासून पाहून ठेका रद्द करण्याची मागणी प्रशासनाला पाठवण्यात येणार असल्याचे साम टीव्हीशी बाेलताना स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

Sangli Breaking News
Bachchu Kadu On Bureaucracy : मंत्रालयाचे सहा मजले सुधारले तर अख्खा महाराष्ट्र सुधरेल : बच्चू कडू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com