Sangli Rain News: सांगलीत वादळी वाऱ्यासह पावसाचं थैमान! मंगलकार्यालयाची भिंत कोसळून एकाचा मृत्यू

Sangli Rain Update: जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. सर्व जखमींना सांगली जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Sangli Rain Update
Sangli Rain Updatesaam tv

Sangli News: सांगलीमध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसानं थैमान घातलं. सायंकाळी आलेल्या या पावसाने धामणी रोडवरील ऐश्वर्या मंगलकार्यालयात भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली, तर 6 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. सर्व जखमींना सांगली जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

धामणी रोडवरील ऐश्वर्या मंगल कार्यालयमध्ये आज लग्न समारंभ आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी लग्न सोहळा आटोपल्यानतंर केटरिंगचे कर्मचारी आपले काम आटोपून घरी जात असताना अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हे सर्व जण जेवणाच्या हॉलमध्ये थांबली होते. परंतु तेवढ्यात पावसामुले तेथील भिंत कोसळली आणि त्याखाली काही जण अडकले. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे.

Sangli Rain Update
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचं आव्हान! ठाण्यात राष्ट्रवादी ठाकरे गटासाठी जागा सोडणार?

सांगलीला मुसळधार पावसानं झोडपलं

सांगली जिल्ह्याला आज मुसळधार पावसाने झोडपून काढले. जिल्ह्यातील अनेक भागाला तळ्याचे स्वरूप आले होते. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे झाडे उन्मळून पडल्याने अनेक दुकानं आणि वाहनांचंही नुकसान झालं. पहिल्याच अवकाळी पावसाने सांगली आणि मिरजेच्या जनतेची तारांबळ उडाली. (Latest Political News)

Sangli Rain Update
Gautam Adani Meets Sharad Pawar: गौतम अदानी शरद पवारांच्या भेटीला! पवार-मुख्यमंत्री भेटीनंतर लगेच अदानी सिल्व्हर ओकवर

आज सकाळपासून वातावरणात प्रचंड उष्मा होता. त्यामुळे सांगलीकर हैराण झाले होते. त्यातच दिवसभर वातावरण ढगाळ असल्याने सायंकाळी पाऊस बरसणार अशी शक्यता होती. सायंकाळी 5 वाजता अवकाळी पावसाने हजेरी लावत सर्वांना चिंब भिजवले. तसेच वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. मध्यवर्ती बस स्थानकात झाडं उन्मळून एका पान टपरीवर पडल्याने मोठे नुकसान झाले. याचबरोबर सांगलीत अनेक ठिकाणी पाण्याचे डोह साचल्याने या पाण्यातून वाहन धारकांना वाहने काढावी लागली. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com