Chakka Jam Andolan : 'पंतप्रधानांनी शब्द पाळला नाही, दोन ऑक्टोबरपासून चक्काजाम आंदाेलन' : वाहतूकदार संघटना आक्रमक

all india motor transport congress news : सांगलीत माध्यमांशी बाेलताना वाहतुकदार संघटनांच्या पदाधिका-यांनी दिला इशारा
all india motor transport congress news
all india motor transport congress newssaam tv
Published On

Sangli News : महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड राज्यामधील चेकपोस्ट बंद करण्याच्या मागणीवरुन राज्यातील वाहतूकदार संघटना आक्रमक झाल्या आहेत. येत्या दोन ऑक्टोबरपासून चक्काजाम करण्याचा वाहतूकदार संघटनेने इशारा दिला आहे. (Maharashtra News)

all india motor transport congress news
Kolhapur News : कानशिलात मारु म्हणता... आमदार भडकले, म्हणाले आम्हांलाही...

ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या (all india motor transport congress) दिल्लीतील बैठकीत हा निर्णय झाला असल्याची माहिती वाहतूकदार संघटनेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब कलशेट्टी यांनी सांगलीत माध्यमांशी बाेलताना दिली. यावेळी सुरेंद्र बोळाज, महेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित हाेते.

all india motor transport congress news
Onion Traders Indefinite Strike : नाशकातील १५ बाजार समित्यांचा कांदा लिलाव आजही बंदच; परवाने रद्द हाेणार, गाळे ताब्यात घेतले जाणार? एपीएमसीसह व्यापा-यांची बैठक

कलशेट्टी म्हणाले देशभरातील तपासणी नाके बंद करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. तरीही १३ राज्यांत नाके अद्याप सुरू आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक व छत्तीसगड या राज्यांना नाके बंद करण्यासाठी २ ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे.

त्यानंतर या राज्यांत चक्काजाम करावा लागेल असा इशारा देखील कलशेट्टींनी दिला. तपासणी नाक्यांवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालतो, त्यामुळे ते बंद झालेच पाहिजेत. शासनाने वाहतुकीचे किमान भाडे व त्याची व्याख्या निश्चित करावी अशीही मागणी वाहतूकदार संघटनेकडून करण्यात आली.

Edited By : Siddharth Latkar

all india motor transport congress news
Sachin Tendulkar ने नाेटीसीचे उत्तर न दिल्यास..., Bacchu Kadu यांचा प्लॅन तयार (पाहा व्हिडिओ)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com