Sudhir Mungantiwar : लांडगा आला रे आला म्हणणारा व्यक्ती व महाविकास आघाडीचा डीएनए समान; सुधीर मुनगंटीवार यांची टीका

Sangli News : दर महिन्याला ते सरकार पडणार असे म्हणतात, पण अजून काही पडले नाही. आता १० जानेवारी म्हणत आहेत, पण १० जानेवारीनंतर हे सरकार पडणार नाही
Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar Saam tv
Published On

सांगली : लांडगा आला रे आला म्हणणाऱ्या व्यक्तीचा आणि महाविकास आघाडीचा डीएनए समान असावा. कारण दर महिन्याला ते सरकार पडणार असे म्हणतात, पण अजून काही पडले नाही. आता १० जानेवारी (Sangli) म्हणत आहेत, पण १० जानेवारीनंतर हे सरकार पडणार नाही. मात्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी असे पडले की, पुन्हा उभे राहण्याच्या पात्रतेचे राहणार नाही; अशी जोरदार टीका संस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली आहे. (Latest Marathi News)

Sudhir Mungantiwar
Agriculture News : खरबूज पिक धोक्यात; सततच्या वातावरणीय बदलामुळे विविध रोगाचा प्रादुर्भाव

राज्याचे संस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे सांगली येथे आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना जानेवारीत सरकार पडणार या विधानावरून महाविकास आघाडीवर (Mahavikas Aaghadi) जोरदार टीका केली आहे.


('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sudhir Mungantiwar
Anganwadi Worker Strike : अंगणवाडी सेविका आक्रमक; भंडाऱ्यात चटणी भाकर आंदोलन, यवतमाळमध्ये रास्ता रोको

राऊरांची अप्रत्यक्ष नरेंद्र मोदींना मदत  
राहुल गांधींमध्ये पंतप्रधान होण्याचे सर्व गुण असल्याचे विधान संजय राऊत यांनी केले आहे. यावरून निशाणा साधताना मुनगंटीवार यांनी संजय राऊत हे अप्रत्यक्ष नरेंद्र मोदींना मदत करत आहेत. पण राहुल गांधींचे नाव घेतल्यावर भाजपलाच मतदान होतं, हे ममता बॅनर्जींना देखील कळलं. त्यामुळे ते राहुल गांधींच्या मागे गेल्या नाहीत; असा टोला मुनगंटीवार यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

सुप्रिया सुळेंना धोका कळला असावा 
सुप्रिया सुळे आता दहा महिने मतदार संघातच थांबणार आहेत व त्यांच्या विधानाचाही सुधीर मुनगंटीवार यांनी समाचार घेतला आहे. कदाचित त्यांना धोका कळला असेल, त्यामुळे जान बची तो लाखो पाय आणि मतदार संघात काही गडबड झाली तर लोक देशाचे नेतृत्व कसं करता येणार. यामुळे सुप्रिया सुळे मतदार संघात थांबणार आहेत. त्यांना आपल्या खूप शुभेच्छा आहेत, बारामतीची लोकसभेची निवडणूक आम्ही खूप कमी अंतराने जिंकू असं विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com