MSRTC Bus : सांगली विभागात १०० बस भंगारात; कमी बसमुळे लांब पल्याच्या फेर्यामध्ये कपात

Sangli News : राज्य परिवहन महामंडळाच्या सांगली विभाग फायद्यात आला आहे. सुरक्षित आणि विना अपघात सेवा देत असल्यामुळे अनेक सवलतीमुळे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाश्याची संख्या ही वेगाने वाढत आहे
MSRTC Bus
MSRTC BusSaam tv
Published On

सांगली : ग्रामीण भागासाठी लाईफलाईन ठरलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस आता खिळखिळ्या झाल्या आहेत. यामुळे अनेक बस या भंगार अवस्थेत झाल्या आहेत. यात सांगलीच्या राज्य परिवहन मंडळाला सध्या भंगार बसच्या आव्हानाला तोंड द्यावे लागत आहे. गेल्या वर्षी ७५ बस भंगारत काढाव्या लागल्या होत्या. आता येत्या तीन महिन्यात आणखीन तीस बस भंगारात जाणार असून वर्षभरात जवळपास १०५ बसेस भंगारात जात आहेत. यामुळे सांगली जिल्ह्यात बसची संख्या कमी पडत आहे. 

राज्य परिवहन महामंडळाच्या सांगली विभाग फायद्यात आला आहे. सुरक्षित आणि विना अपघात सेवा देत असल्यामुळे अनेक सवलतीमुळे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाश्याची संख्या ही वेगाने वाढत आहे. उत्कृष्ट सेवा बजावून विना अपघात सेवा देणाऱ्या बसला मात्र भंगार बसचे ग्रहण लागले आहे. तर गेल्या पाच ते सहा वर्षात सांगली आगाराला एकही नवीन बस मिळाली नाही. अनेक बसेच जुन्या झाल्यामुळे भंगार बस मधूनच प्रवाशांना जावे लागत आहे. 

MSRTC Bus
Cotton Price : भाव नसल्याने घरात कापसाची साठवणूक; शेतकऱ्यांला भाववाढीची अपेक्षा

बसअभावी फेऱ्यांमध्ये करावी लागते कपात 

पंधरा वर्षाचा कालावधी गेल्यानंतर संबंधित बस ही भंगारत काढावी लागते. यामुळे गेल्या वर्षभरात ७५ बसेस भंगारात काढण्यात आल्या आहेत. तर पुढील तीन महिन्यात आणखी ३० बसेस भंगारात काढाव्या लागणार आहेत. अगोदरच बसेसची संख्या कमी आणि भंगार बसचे प्रमाण वाढल्यामुळे आता सांगलीच्या एसटी महामंडळाकडे ६९० बसच उरल्या आहेत. परिणामी बस अभावी बसफेऱ्यांमध्ये कपात करावी लागत आहे. प्रामुख्याने लांब पल्ल्याच्या फेऱ्यांवर याचा परिणाम होत आहे. 

MSRTC Bus
Nylon Manja : नायलॉन मांजाची विक्री; नाशिकमध्ये ५ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, कल्याणमध्येही ६ जणांवर गुन्हा

नवीन बससाठी प्रस्ताव 

प्रवाशांची वाढती संख्या आणि नादुरुस्त बसचे प्रमाण पाहता सांगली जिल्ह्यासाठी नवीन बसेसची गरज आहे. तसा प्रस्ताव देखील शासनाकडे पाठवला असून हा विषय प्रलंबित राहिला आहे. सांगलीला किमान यावर्षी १०० बसचा पुरवठा करण्यात यावा; अशी मागणी शासनाकडे करण्यात आले आहे. जेणेकरून कपात होत असलेल्या बस फेऱ्या नियमित चालविता येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com