Nylon Manja : नायलॉन मांजाची विक्री; नाशिकमध्ये ५ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, कल्याणमध्येही ६ जणांवर गुन्हा

Nashik Kalyan News : पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर केला जातो. मांजा धोकेदायक ठरत असून अनेकजण जखमी तर काही जणांना जीव गमवावा लागला यामुळे प्रशासनाने नायलॉन मांजा विक्री करण्यास बंदी घातली आहे
Nylon Manja
Nylon ManjaSaam tv
Published On

अभिजीत देशमुख/ अभिजीत सोनवणे

कल्याण/ नाशिक : मकरसंक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पतंग राज्यभरासह देशभरात उडवले जातात. मात्र यात वापरण्यात येणाऱ्या चायनीज नायलॉन मांजामुमुळे अनेक घटना घडून अनेकांनी आपला जीव देखील गमावला आहे. त्यामुळे नायलॉन मांजा विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील विक्री केली जात असताना कल्याण- डोंबिवलीमध्ये ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नाशिकमध्ये ५ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. 

संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पतंग राज्यभरासह देशभरात उडवले जातात. पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर केला जात असतो. हा मांजा धोकेदायक ठरत असून अनेकजण जखमी तर काही जणांना जीव गमवावा लागला आहे. यामुळे प्रशासनाने नायलॉन मांजा विक्री करण्यास बंदी घातली आहे. तरी देखील याची विक्री व वापर होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

Nylon Manja
Nylon Manja : नायलॉन मांजामुळे कापला महिलेचा पाय व तरुणाचा गळा; अकोल्यातील घटना, मांजाचा वापर सुरूच

कल्याण- डोंबिवलीत कारवाई 

कल्याण- डोंबिवलीतील पोलीसांनी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली आहे. गेल्या काही दिवसांपासून मांजा विक्रेत्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. कल्याण- डोंबिवलीतील एकूण सहा जणांविरोधात नायलॉन मांजा विक्री प्रकरणी गुन्हे दाखल करत कारवाई केली आहे. यावेळी पोलिसांनी हा मांजा नागरिकांसाठी धोकादायक आहे; अशा प्रकारचा मांजा कुणी विक्री करताना किंवा वापर करताना आढळून आल्यास गुन्हे दाखल करत कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

Nylon Manja
Navapur News : कोंडाईबारी घाटात हातपाय बांधलेल्या स्थितीत आढळला तरुणाचा मृतदेह; चार दिवसांपासून होता बेपत्ता

नाशिकमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा 

जीवघेणा नायलॉन मांजामुळे मागील काही दिवसात नाशिकमध्ये १९ घटनांमध्ये अनेक जण गंभीर जखमी यामुळे पोलीस अक्शन मोडमध्ये आहेत. नाशिकमध्ये नायलॉन मांजा विक्रेत्यांवरील कारवाईला वेग आला आहे. यात पोलिसांनी ५ नायलॉन मांजा विक्रेत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच आत्तापर्यंत ७४ नायलॉन मांजा विक्रेत्यांना पोलिसांनी तडीपार केले आहे. दरम्यान रविवारी नाशिक पोलिसांनी ३ ठिकाणी छापे टाकत १ लाखांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. नायलॉन मांजा विक्रेत्यांसह आता नायलॉन मांजा वापरणारे देखील रडारवर असून थेट इमारतींच्या टेरेसवर जाऊन तपासणीचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. 

वैजापूर पोलिसांनी ९३ हजारांचा नायलॉन मांजा केला जप्त
संभाजीनगर
: नायलॉन मांजा विक्री करण्यास बंदी घातली असताना देखील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर पोलिसांनी अवैधरित्या मांजा विक्री करणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ९३ हजार सहाशे रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त करत वैजापूर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विराज संदीप सोनवणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याने मांजा कुठून घेतला याचा शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com