संजय सूर्यवंशी
नांदेड : मागील वर्षी भाव वाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला होता. यानंतर यंदा देखील शेतकऱ्यांवर तीच वेळ आली आहे. कापसाला यंदा अपेक्षेपेक्षा कमी भाव असल्याने नांदेड जिल्ह्यातील ७५ टक्के शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला आहे. आता कापसाचे दर वाढतील यानंतर विक्री करण्याच्या विचारात शेतकरी असल्याचे पाहण्यास मिळत आहे.
नांदेड जिल्ह्यात मागील खरीप हंगामात हजारो हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. मात्र जुन, जुलै माहिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाचे मोठे नुकसान झाले. तसेच कापूस फुटताना देखील अवकाळी पावसाने नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांचे वर्षभराचे अर्थकारण कापसावर असल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या. मात्र या अपेक्षांचा भंग होत असल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे.
७५ टक्के शेतकऱ्यांची घरात साठवणूक
गेल्या वर्षी कापसाला ८ हजार ८०० ते ९ हजार २०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळाला होता. मात्र या वर्षी पावसाने भिजलेल्या कापसाला व्यापाऱ्यांकडून ७ हजार ते ७ हजार २०० रुपये इतकाच भाव मिळत आहे. सुरवातीपासूनच कापसाच्या दरात वाढ झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेवर कापूस घरात साठवून ठेवला आहे. जिल्ह्यात जवळपास ७५ टक्के शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेवर कापुस घरात साठवून ठेवला आहे.
एपीएमसी बाजारात मक्याचे दर घसरले
नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात सध्या मक्याचे दर घसरल्याने व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बाजारात मक्याची आवक चांगली होत असून मालाला उठाव नसल्याने दर मोठ्या प्रमाणात घसरल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सध्या बाजारात मक्याच्या कणसाची एक गोणी ४०० रुपयांना विकली जात असून आठवड्याभरातच यामध्ये १०० रुपयांची घसरण झाली. पुढील काही दिवस दर कमीच राहणार असल्याने व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.