Cyber Crime: पोलिसालाच ऑनलाईन गंडा..लाखो रुपयांची फसवणूक

पोलिसालाच ऑनलाईन गंडा..लाखो रुपयांची फसवणूक
Cyber Crime
Cyber Crimesaam tv
Published On

सांगली : बँक खात्याची केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने बँक खाते क्रमांक आणि ओटीपी नंबर विचारून घेत एका अज्ञाताने चक्क रेल्वे पोलिसाच्या खात्यावर तब्बल ऑनलाईन 8 लाख रुपयांचे कर्ज काढून रक्कम हडप केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मिरज रेल्वे पोलिस (Railway Police) दलातील तानाजी बच्चाराम पसारे यांनी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (sangli news Online scam of millions of rupees to the railway police)

Cyber Crime
दुचाकीवरून येत काढली छेड; अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

रेल्‍वे पोलिस दलातील बच्‍चाराम पसारे यांना 24 जानेवारीला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्या व्यक्तीने ‘मी स्टेट बँकेतून (State Bank Of India) बोलत आहे. तुमच्या बँक खात्याची केवायसी अपडेट न केल्यास पगाराचे खाते बंद होईल’ असे सांगितले. वडील रुग्णालयात असल्याने पसारे यांनी गडबडीत (Online Fraud) बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक सांगितला.

मोबाईल क्रमांक बदलला

त्याचा वापर करुन अज्ञाताने पसारे यांच्या बँक खात्याला जोडलेला त्यांचा मोबाइल क्रमांक बदलला. मोबाईल क्रमांक बदलल्याचा मेसेज आल्याने पसारे यांनी बँकेत जाऊन याबाबत चौकशी केली. त्यावेळी त्यांच्या खात्यावर (Cyber Crime) ऑनलाईन ८ लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज काढून त्यातील ७ लाख ७५ हजार रुपये काढून घेतल्याचे निदर्शनास आले.

कोलकाता व दुर्गापूरमधील एटीएम

पसारे यांनी पुन्हा बँकेत जाऊन खात्यावरील व्यवहार पाहिल्यानंतर त्यांनी कर्ज घेतले नसतानाही अज्ञाताने बँक खात्याला जोडलेल्या मोबाईल क्रमाकांचा गैरवापर करीत परस्पर वैयक्तिक कर्ज क्रेडीट करून हा प्रकार केल्याचे उघडकीस आले. पश्चिम बंगालमधील कोलकाता व दुर्गापूर येथील एटीएममधून पसारे यांच्या खात्यावरील काही रक्कम काढल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत पसारे यांनी पोलिसात फसवणुकीची तक्रार दिली आहे. याप्रकरणी अज्ञाता विरुद्ध महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com