Sangli News
Sangli NewsSaam tv

Sangli News: दिल्लीतील कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी रस्त्यावर

दिल्लीतील कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी रस्त्यावर
Published on

सांगली : दिल्लीत सुरू असणाऱ्या राष्ट्रीय कुस्तीपटूच्या आंदोलनास वाळवा तालुका (NCP) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने समर्थन दिले आहे. कुस्‍तीपटूंच्‍या समर्थनार्थ (Sangli News) राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने रस्‍त्‍यावर उतरून आंदोलन केले. (Latest Marathi News)

Sangli News
Pandharpur Chandan Uti Puja: चंदनउटी पूजेतून विठ्ठल मंदिर समितीला ३५ लाखांचे उत्पन्न; ८५ किलो चंदनाचा वापर

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थितीत कुस्‍तीपटूंच्‍या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस वाळवा तालुका कडून इस्लामपूर येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासहीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

Sangli News
Success Story: शेतकरी पुत्राची कमाल; सात जागांवर परीक्षा देशातून तिसरा क्रमांक, भारतीय सैन्य दलात अधिकारी

लोकशाही संपविली जातेय

यावेळी देशातील भाजपा (BJP) सरकारकडून लोकशाही संपवली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला. तसेच महिला कुस्तीपटूंच्या बाबतीत गैरवर्तन करणाऱ्याला भाजप पाठीशी घालत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी यावेळी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com