Sangli News : देवा तुला शोधू कुठं? महापालिकेने थेट देवाला पाठवली नोटीस, नागरिक मात्र संतप्त

Sangli : सांगलीमध्ये अजब-गजब प्रकार घडला आहे. सांगलीच्या महापालिकेने थेट देवाला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. या प्रकारामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. देवाच्या नावे आलेल्या नोटीसवर महापालिका कारवाई करणार का असा सवाल विचारला जात आहे.
Sangli News
Sangli NewsSaam Tv
Published On

विजय पाटील, साम टीव्ही, प्रतिनिधी

सांगलीत अजब प्रकार घडला आहे. सांगली शहरातील म्हसोबा मंदिराला महापालिकेकडून घरपट्टीची नोटीस पाठवण्यात आली आहे. या मंदिराच्या नावे घरपट्टी भरण्याची नोटीस बजावण्यात आल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महापालिकेच्या या कृत्येने नागरिक संतप्त झाले आहेत.

नुकतंच सांगली महापालिका क्षेत्रामध्ये वाढीव घरपट्टी लादण्याचा निर्णय घेण्यात आला. ड्रोनद्वारे सर्वेक्षण करुन घरपट्टी देण्यात आली. या सर्वेक्षणाद्वारे सांगली शहरातील खणभाग येथील म्हसोबा गल्लीमधील म्हसोबा मंदिराला घरपट्टी भरण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. मंदिराच्या नावाने दिलेले घरपट्टी बिल कोण भरणार? आता देवाला कर भरावा लागणार का? घरपट्टी वसुलीबाबत महापालिका काय भूमिका घेणार? असे प्रश्न विचारले जात आहेत.

सांगली महापालिकेच्या या अजबगजब कारभाराबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या मंदिराला ड्रोनद्वारे सर्वेक्षण करुन नोटीस बजावण्यात आली आहे. महानगरपालिकेने देवालाही सोडले नसल्याचे लोक म्हणत आहेत. घरपट्टीच्या विरोधात जनआंदोलन उभे करुन कायदेशीर लढाई लढणार असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.

Sangli News
Ulhasnagar News : गटाराच्या पाण्यात धुतल्या भाज्या, नागरिकांच्या जीवाशी खेळ; पाहा VIDEO

महापालिकेने ड्रोनद्वारे शहरात सर्व्हे करण्यात आला. तंत्रज्ञानाचा वापर करुन नागरिकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये तब्बल २९ हजार प्रॉपर्टी निदर्शनास आले आहेत. ज्या घरांची नोंदणी नाही, अशांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. पण देवाच्या मंदिराला नोटीस पाठवल्याने खळबळ उडाली आहे.

Sangli News
Minister Pratap Sarnaik: स्वारगेट अत्याचारकांडानंतर प्रशासनाला जाग; महामंडळात नेमणार IPS अधिकारी, बसेसमध्ये बसणार CCTV

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com