Jayant Patil ED Inquiry: ईडी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी मुदत मागणार; जयंत पाटील

ईडी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी मुदत मागणार; जयंत पाटील
Jayant Patil
Jayant PatilSaam tv
Published On

सांगली : आयएल आणि एफएस (IL & FS) प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीकडून (ED) नोटीस पाठवण्यात आली आहे. त्‍यांना सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश नोटीशीतून देण्यात आले होते. मात्र जवळच्या नातेवाइकांचे दोन दिवसांत लग्न समारंभ असल्याने चौकशीसाठी हजर राहू शकत नाही आणि त्यामुळे चौकशीसाठी वेळ वाढवून मिळावा; याबाबतचे पत्र जयंत पाटील यांनी ईडीला पाठवून चौकशीसाठी मुदत वाढवून मागणार आहेत. (Live Marathi News)

Jayant Patil
Raigad Accident: पेणजवळ कंटेनरला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी

दरम्यान जयंत पाटील यांच्याशी संबंधित काही संस्थांना आयएल अँड एफएस प्रकरणातील काही आरोपी कंपन्यांनी कमिशन रक्कम दिल्याचा आरोप ईडीने केला आहे. याच व्यवहारांबद्दल जयंत पाटील यांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवले जातील.

Jayant Patil
Maharashtra Heat Wave: जळगाव, नंदूरबारमध्‍ये तापमानाने गाठला उच्चांक

मात्र या नोटीसवर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी ज्या आयएल अँड एफएस कंपनीच्या प्रकरणात ईडीने नोटीस बजावली आहे. त्या कंपनीसोबत माझा रुपयाचाही व्यवहार नाही. जिथे काही देणे- घेणेच नाही, तिथे नोटीस काढली जाते. ईडी का नोटीस काढते हे सगळ्या देशाला माहीत आहे; अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com