Chandoli Dam : चांदोली धरणातून १४६५ क्यूसेकने विसर्ग; वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ

Sangli News : सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण क्षेत्रातील पातरपुंज निवडे धनगरवाडा चांदोली येथे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.
Chandoli Dam
Chandoli DamSaam tv
Published On

सांगली : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात तसेच चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गेली दोन दिवस सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने धरणातून शनिवार व रविवारी १ हजार ४६५ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला.. यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. 

Chandoli Dam
Bear Attack : गुरे चारण्यासाठी गेलेल्या इसमावर अस्वलाचा हल्ला; गुराखी गंभीर जखमी

सांगली (sangli) जिल्ह्यातील चांदोली धरण क्षेत्रातील पातरपुंज निवडे धनगरवाडा चांदोली येथे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. तसेच शिराळा तालुक्यात सर्वच मंडल क्षेत्रात यावर्षीच्या एकूण १ हजार मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. गेल्या दोन दिवसापासून शिराळा तालुक्यात (Heavy Rain) पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे पिकांना जीवदान मिळाले. चांदोलीत पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणाचे चारीही वक्राकार दरवाजे व वीजनिर्मिती केंद्रातून विसर्ग बंद केला आहे. चांदोली धरणात एकूण ३२.३३ टक्के म्हणजे ९३.९७ टक्के धरण भरले आहे. धरणात उपयुक्त पाणीसाठा २५.४५ टक्के इतका आहे.

Chandoli Dam
Dhule Rain : धुळ्यात सलग चौथ्या दिवशी पावसाचा कहर; पांझरा नदीवरील तीनही पूल गेले पाण्याखाली

पावसाने पिकांचे नुकसान 

अगोदरच्या पावसामुळे नदीकाठच्या शेतात पाणी साचल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. ऊस, भुईमूग, सोयाबीन आधी पिके धोक्यात आली आहे. तालुक्यात अतिवृष्टीमुळे ३२ गावातील ५ हजार १५४ हेक्टर पैकी भाताचे ३९० हेक्टर ऊस, १ हजार ६१९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. तर ६ हजार २३८ शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसला असून नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com