Dhule Rain : धुळ्यात सलग चौथ्या दिवशी पावसाचा कहर; पांझरा नदीवरील तीनही पूल गेले पाण्याखाली

Dhule News : धुळे जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सारी बरसत आहेत. मागील तीन दिवस मुसळधार पाऊस झाल्यानंतर सलग चौथ्या दिवशी देखील पावसाचा कहर बघावयास मिळत आहे
Dhule Rain
Dhule RainSaam tv
Published On

धुळे : धुळे शहर व परिसरात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. यात आज सलग चौथ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे सर्वदूर पाणीच पाणी झाले आहे. दरम्यान शहरातून गेलेल्या पांझरा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ झाल्याने तिन्ही पूल पाण्याखाली गेले आहेत. 

Dhule Rain
Dhule Crime : पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातून मंगलपोत तोडून पसार; चोरटा पोलिसांच्या ताब्यात

धुळे (Dhule) जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. मागील तीन दिवस मुसळधार पाऊस झाल्यानंतर सलग चौथ्या दिवशी देखील पावसाचा कहर बघावयास मिळत आहे. यामुळे पांझरा नदीवरील धुळे शहरातील तीनही पूल पाण्याखाली गेले आहेत. अक्कलपाडा धरणातून मोठ्या प्रमाणात पांझरा नदीत (Panjhara River) विसर्ग केला जात आहे.  त्यामुळे शहरातील तीनही पूल बुडाल्यामुळे शहरातील संपूर्ण वाहतूक फक्त एकाच पुलावरून सुरू आहे. 

Dhule Rain
Bear Attack : गुरे चारण्यासाठी गेलेल्या इसमावर अस्वलाचा हल्ला; गुराखी गंभीर जखमी

चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसाचा जनजीवनावर परिणाम होतांना दिसून येत आहे. धुळे शहरापासून जवळ असलेल्या अक्कलपाडा धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने पांझरा नदीला अगोदरच पूर आला आहे. तर आजच्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत आणखीच वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धुळे शहरातील पांझरा नदीवरील कालिका माता मंदिर पूल, गणपती पूल व सावरकर पुतळा हे तीनही पूल पाण्याखाली गेले आहे,

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com