

सांगली : लग्न होवून संसाराला सुरवात झाली. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून पत्नी माहेरी गेली अन् ती नांदायला यायला तयार नाही. यामुळे त्रस्त पतीने पोलिस (Police) स्टेशन गाठले. परंतु, पोलिसही दखल घेत नसल्याने त्रासलेल्या (Sangli News) पती थेट मोबाईल टॉवरच चढला अन् आंदोलनाला सुरवात केली. (Maharashtra News)
सांगलीच्या जत शहरामध्ये एका पतीने मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन करत असलेला चांदसाब चिवनगी असे पतीचे नाव आहे. चांदसाब चिवनगी हा मूळचा कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातल्या इंडी इथला आहे. त्याचं लग्न जत तालुक्यातल्या गिरगाव इथल्या मुलीशी झाले असून त्यांना चार आपत्य देखील आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पत्नी माहेरी निघून आली आहे. वारंवार विनंती करून देखील सासरची लोक पत्नीला पाठवत नसल्याने चांदसाब यांनी जत पोलीस ठाण्यामध्ये देखील धाव घेतली होती.
पत्नीला बोलावून तडजोडीच्या आश्वासनानंतर उतरला खाली
मात्र त्या ठिकाणी दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर आज सकाळी थेट जत पोलीस ठाण्यासमोर असणाऱ्या मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केलं. सुमारे तासभर चांदसाब हा मोबाईल टावरवर बसून होता. त्यामुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर पोलिसांनी पत्नीला बोलून घेऊन तडजोड करण्याच्या आश्वासन दिल्यानंतर चांदसाब खाली उतरला. सुमारे तासभर सुरू असलेला हा सिनेस्टाईल गोंधळ थांबला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.