Miraj Crime : शिंदे गटाच्या जिल्हा युवा समन्वयकावर जीवघेणा हल्ला; आर्थिक व्यवहारातून घडली घटना

Sangli News : हॉटेल मालक आणि एका कामगाराचं आर्थिक देवाण-घेणातून वाद सुरू होता. हा वाद विकोपाला पोहचला व याठिकाणी काही बाहेरून तीन- चार जण आले
Miraj Crime
Miraj CrimeSaam tv
Published On

सांगली : आर्थिक व्यवहारातून काही घटना घडत असतात. अशाच प्रकारे सांगलीच्या मिरजेमध्ये हॉटेल मालक व कामगारांत आर्थिक देवाण- घेवाण मधून वाद झाला होता. या वादातून काहींनी हल्ला केला असून शिंदेंच्या शिवसेनेच्या जिल्हा युवा समन्वयकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. यामध्ये तीन जण जखमी झाले आहेत. 

सांगली (Sangli) जिल्ह्यातील मिरजमधील शिंदे गट शिवसेनेचे जिल्हा युवा समन्वयक मतीन काझी यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला आहे. त्यांच्यासह हॉटेल मालक आणि त्यांची पत्नी देखील गंभीर जखमी झाली आहे. मिरजेत रवींद्र येसूमाळी यांचे रस्सा नावाचे हॉटेल आहे. हॉटेल मालक आणि एका कामगाराचं आर्थिक देवाण-घेणातून वाद (Crime News) सुरू होता. हा वाद विकोपाला पोहचला व याठिकाणी काही बाहेरून तीन- चार जण आले. 

Miraj Crime
Sanjay Gaikwad News : विधानसभेत पक्षातील नेत्यांनी काम न करता गद्दारी केली; आमदार संजय गायकवाड यांच्या गौप्यस्पोटाने शिवसेनेत खळबळ

दरम्यान या वादातून एजाज शेख, अमन गोदड, सोहेल नदाफ, शंकर रिक्षावाला आणि शिव अथणीकर यांनी हॉटेलवर येत जोरदार राडा घातला. यावेळी त्यांनी हॉटेल मालक रवींद्र येसुमाळी आणि त्यांची पत्नी वैशाली येसूमाळी यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. यावेळी शिंदेंच्या शिवसेनेचा पदाधिकारी मतीन काझी याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हल्लेखोरानी मतीन काझी याच्यावर देखील कोयत्याने हल्ला केला. 

Miraj Crime
Bunty Shelke News : मध्य नागपूरची जागा हरावी यासाठी पक्ष संघटन कमजोर केले; बंटी शेळके यांचा नाना पटोलेंवर आरोप

तिघेजण जखमी 

या हल्ल्यात मतीन काझीसह तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर मतीन काझी टोळीने संशयीतांच्या घरावर मध्यरात्री हल्ला करून साहित्याची तोडफोड केली आहे. दरम्यान दोन गटात झालेल्या या हल्ल्यामुळे मिरजेत मध्यरात्री मोठ्या प्रमाणात जमाव देखील जमला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com