पराग ढोबळे
नागपूर : नाना पटोले हे आरएसएसचे एजंट आहेत. मध्य नागपुर हे संघ मुख्यालय व नितीन गडकरी यांचे घर मध्य नागपूर मतदारसंघात असल्यामुळे ही जागा भाजपने जिंकावी; यासाठी नाना पटोले यांनी काम केलं आणि काँग्रेसचे संघटन कमजोर केलं. विधानसभा निवडणुकीत मला कुठलीही मदत त्यांनी केली नसल्याचा आरोप बंटी शेळके यांनी नाना पटोले यांच्यावर केला आहे.
विधानसभा निवडणुकीत मध्य नागपूरमधील (Congress) काँग्रेसचे उमेदवार असलेले बंटी शेळके यांनी आज माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात जोरदार हल्लाबोल केला. तसेच (Nagpur) नागपुरातील त्यांचे शिपे सालार म्हणत त्यांनी काँग्रेसच्या पक्ष संघटनेवर शंका उपस्थित केली.
म्हणूनच ते आरएसएसचे एजंट
निवडणुकीच्या काळात जर असे प्रश्न विचारले असते, तर कार्यकर्त्यांचे मनोधर्य खचले असते. मात्र त्यावेळेस आरोप लावले नाही. आरएसएस एजंट नाना पटोले यांच्या मतदारसंघातील देवरी बॉर्डरवर आरटीओ विरोधात आंदोलन केलं. त्याला परवानगी देऊ नका अस नाना पटोले सांगतात. उलट माझ्यावर हल्ला झाला त्यावर एकही शब्द नाना पटोले बोलले नसल्याचे शेळके म्हणाले. नाना पटोलेची कॉंग्रेस कार्यकर्त्यांबद्दल द्वेष भावना असल्यामुळे ते आरएसएसचे एजंट आहे; असा आरोप आहे.
आम्ही राहुल गांधी यांचे शिपाई
आरएसएस एजंट नाना पटोले यांनी माझी नस कापली तर त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात काँग्रेसच लिहिलेला आहे. आम्ही आरएसएस एजंट नाना पटोले यांचे शिपाई नाही, तर राहुल गांधी यांचे शिपाई आहे.
संघ मुख्यालय समोर आरएसएसचे वेश जाळण्याचा काम बंटी शेळकेने केले. मात्र त्यावेळेस नाना पटोले एकही शब्द बोलले नाही. लोकानी मला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावर नाना पटोले एकही शब्द बोलले नाही तेव्हा कुठे गेले होते. माझा चार हजार मताने पराभूत झाला असताना तीन जणांचं नाव प्रदेश कार्यालयातून पाठवण्यात आले असता माझं नाव उमेदवार म्हणून नाव टाकण्यात आलं नाही.
प्रियंका गांधी माझ्या प्रचारासाठी येत असताना तिथे काँग्रेसने कुठलीही ताकद उमेदवार म्हणून दिली नाही. माझ्यावर कारवाई झाली तेव्हा काँग्रेसचे वकील सेल कुठे गेले होते. भाजपचे उमेदवार प्रवीण दटके हे इरफान काजी नामक व्यक्तीला बोलावतात व २० लाख देतात. पण त्या व्यक्तीने ते पैसे घेतले नाही. नाना पटोले म्हणतात तुझी उमेदवारी पक्की आहे असे सांगतात. येत्या काही दिवसात अनेक खुलासे करणार असल्याचेही शेळके यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.