Sangli’s Class 10 student Shaurya Patil, who ended his life by jumping before a running Delhi Metro after alleged teacher harassment.
Sangli’s Class 10 student Shaurya Patil, who ended his life by jumping before a running Delhi Metro after alleged teacher harassment.Saam Tv

सांगलीच्या विद्यार्थ्याची दिल्लीत आत्महत्या, शिक्षकांकडून छळ, धावत्या मेट्रोसमोर उडी

Sangli Teen Suicide Sparks Outrage: शिक्षकाच्या छळाला कंटाळून सांगलीतल्या दहावीच्या विद्यार्थ्यांनं दिल्लीत धावत्या मेट्रोसमोर आत्महत्या केलीय...शौर्यसोबत नेमकं काय घडलं? त्यानं सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं?
Published on

हा सांगलीचा शौर्य पाटील....दिल्लीतल्या अत्यंत प्रतिष्ठित स्कूलमध्ये दहावीत शिकत होता....शौर्यला उत्तम शिक्षण मिळावं म्हणून त्याच्या आई-वडिलांनी त्याला स्प्रींग डेल पब्लिक स्कूलमध्ये घातलं...मात्र उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाचे धडे मिळण्याऐवजी शौर्यचा या शाळेत शिक्षकांनी अमानुष छळ झाला.....हे सारं सहन न झाल्यामुळे १६ वर्षांच्या शौर्यनं थेट मृत्यूलाच कवटाळणं पसंत केलं....शौर्यनं दिल्लीतल्या धावत्या मेट्रोसमोर उडी घेत आत्महत्या केली. मात्र आत्महत्येपूर्वी शौर्यनं लिहिलेली सुसाईड नोट शाळांच्या डोळ्यांमध्ये अंजन घालणारी आहे.

मेरा नाम शौर्य पाटील हैं... इस मोबाइल नंबर पर कॉल कर देना प्लीज... आय अॅम व्हेरी सॉरी... आय डीड धीस...पर स्कूलवालोंने इतना बोला की, मुझे यह करना पडा. यदी किसी को जरूरत हो तो मेरे अंग दान कर देना. मेरे पॅरेंटसने बहुत कुछ किया, आय अॅम सॉरी, मैं उनको कुछ नहीं दे पाया... सॉरी भैय्या... सॉरी मम्मी, आपका आखरी बार दिल तोड रहा हूं... स्कूल की टीचर है ही ऐसी क्या बोलू....

शिक्षकांनी केलेल्या शौर्यच्या छळाबाबत पालकांनी वारंवार तक्रारी करूनही शाळेनं दुर्लक्ष केले. आणि त्यामुळेच त्लाया जीव गमवावा लागल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केलाय. शौर्यच्या समर्थनात या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेसमोरच जोरदार निदर्शनं केली. संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केलीय.

शौर्यची ही कहाणी केवळ एका कुटुंबाचं दुःख नाही... तर उत्तम शिक्षण मिळावं यासाठी आई-वडील लाखों रुपये फी भरून आपल्या मुलांना मोठमोठ्या शाळांमध्ये पाठवतात. मात्र या शाळांमधल्या शिक्षकांकडून होणारी छळवणूक थेट विद्यार्थ्यांच्या जीवावरच उठू लागल्याचं या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com