Accident News : विठुरायाच्या दर्शनाला जाताना वाटेत काळाने गाठले, भरधाव वाहनाच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू

Sangali Accident News : पंढरपूरच्या वारीसाठी निघालेल्या उत्तम बाबासो पाटील यांचा मिरज तालुक्यातील भोसे फाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. मिरज ग्रामीण पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू.
ratnagiri pandharpur accident news
ratnagiri pandharpur accident news AI Image
Published On: 
Summary
  • पंढरपूरच्या वारीसाठी निघालेल्या उत्तम बाबासो पाटील यांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू.

  • सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील भोसे फाटा येथे पहाटेच्या सुमारास अपघात.

  • अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत वारकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू

  • मिरज ग्रामीण पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली

पंढरपूरच्या वारीसाठी भक्तिभावाने निघालेल्या एका वारकऱ्याचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात असलेल्या भोसे फाटा येथे पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. उत्तम बाबासो पाटील असे मृत्यू झालेल्या वारकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तम बाबासो पाटील हे पंढरपूरच्या वारीसाठी निघाले होते. प्रवासादरम्यान ते मिरज तालुक्यातील भोसे फाटा परिसरात आले असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. वारीसाठी भक्तीभावाने निघालेल्या वारकऱ्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ratnagiri pandharpur accident news
Ladli Behna Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! १५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

अपघाताची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे परिसरात काही काळ चिंता आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन सांगलीच्या SRF आपत्कालीन पथकाला घटनास्थळी बोलावण्यात आले.

ratnagiri pandharpur accident news
Blood Sugar:  शुगर कंट्रोल करण्याचा सर्वात सोपा उपाय! रात्री खोलीत 'ही' एक गोष्ट , रक्तातील साखर राहील एकदम नॉर्मल

SRF पथकाने घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी मृतदेह पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. दरम्यान, अपघात घडवून घटनास्थळावरून निघून गेलेल्या अज्ञात वाहनाचा शोध पोलीस घेत आहेत. संबंधित वाहन कोणते होते आणि अपघात नेमका कसा घडला, याचा तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.