Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ७ जण गंभीर जखमी

Samruddhi Mahamarg Accident News: चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे...
Accident News
Accident NewsSaamtv

मनोज जैस्वाल, प्रतिनिधी...

Samruddhi Highway Accident: गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका अद्याप सुरू आहे. आज सकाळी ड्रायव्हरला डुलकी आल्यामुळे समृद्धी हायवेवर कारंजा टोल प्लाजा समोर एक भीषण अपघात झाला. या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Accident News
Beed News: मोठी बातमी! बीड शिवसेना जिल्हाप्रमुखांची हकालपट्टी; सुषमा अंधारेंना मारहाण केल्याच्या दाव्यानंतर कारवाई

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी (शुक्रवार, १९ मे) एक कुटुंब तुळजापूरवरून नागपूरला (Nagpur) जाण्यासाठी निघाले होते. यावेळी पहाटे पहाटे कारंजा टोल प्लाजा समोर त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये गाडीतील सात जण गंभीर जखमी झाले आहेत. चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे...

अपघातानंतर मंगरूळपीर येथील गजानन मिटकरे हे नागपूरला जात असताना त्यांनी तात्काळ गाडी थांबवून जखमींना आपल्या गाडीमधून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तर उर्वरीत लोकांना रुग्णवाहिकेने उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ अहमद अकबानी यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावतीला पाठवण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Accident News
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांना बोलू द्या, ते बोलल्याने आमच्या जागा वाढणार आहेत; संजय राऊतांचा सणसणीत टोला

सचिन नखाते (वय 48), छाया विष्णू करंडे (वय 54) कु सोनाक्षी सचिन नखाते (वय 12) तेजस्विनी अनुराग करडे (वय 28) मल्हार नखाते (वय 4) कृष्णा अनुराग करंडे (वय 5) आरती सचिन नखाते (वय 40) विष्णू करंडे (वय 65) अशी या अपघातात जखमी झालेल्यांची नावे असून हे सर्वजण एकाच कुटूंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे.. (Samruddhi Highway)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com