Samruddhi Mahamarg : आगडोंब! केमिकल वाहतूक करणाऱ्या टेम्पोनं घेतला पेट, 'समृद्धी'वर ६ तास वाहतूक खोळंबली

Samruddhi Mahamarg News : समृद्धी महामार्गावर केमिकल वाहतूक करणाऱ्या वाहनाला अचानाक आग लागली. त्यामुळे सहा तास वाहतुकीचा खोळंबा झालाय.
samruddhi expressway.jpg
samruddhi expressway.jpgSaam TV
Published On

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर कोपरगाव शिवारात केमिकल वाहतूक करणाऱ्या वाहनाला आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान घडली होती. तब्बल सहा तासांनंतर मध्यरात्री दोन वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी केमिकल वाहतूक करणारे वाहन जळून खाक झालं आहे. आगीवर नियमंत्रण मिळवण्यासाठी यादरम्यान समृध्दी महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती.

छत्रपती संभाजीनगरहून मुंबईच्या दिशेने केलिकल घेऊन निघालेल्या वाहनाला अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शिवारात आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. प्रसंगावधान राखत चालकाने वाहन थांबवत बाहेर उडी मारून स्वतःचे प्राण वाचवले. गाडीत केमिकल असल्याने आग आणखी भडकली आणि काही क्षणात समृध्दी महामार्गावर आगीचा आगडोंब उसळला. माहिती मिळताच कोपरगाव, शिर्डी, राहाता, श्रीरामपूर, सिन्नर अशा विविध ठिकाणची अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली.

samruddhi expressway.jpg
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर डिझेल चोरांची टोळी पकडली; ४ अटकेत, दोन वाहने जप्त

मात्र केमिकलमुळे उसळलेली आग शर्थीचे प्रयत्न करूनही आटोक्यात येत नव्हती. अखेर सहा तासांच्या प्रयत्नांनंतर रात्री दोन वाजेच्या दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी संबंधित वाहन जळून खाक झालंय. दरम्यान मोठ्या प्रमाणात आग लागल्याने समृध्दी महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. त्यामुळे इतर वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. पण आग नेमकी कशामुळे लागली होती? हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

samruddhi expressway.jpg
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर दोन वर्षांत १४० अपघात; २३३ जणांचा झाला मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com