Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कारची जोराद धडक, दोन कामगारांचा मृत्यू

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर डोणगावजवळ अपघातात दोन कामगारांचा मृत्यू. भरधाव कारने दिली धडक. वाढत्या अपघातांमुळे महामार्ग सुरक्षेवर प्रश्नचिन्ह.
 Samruddhi Highway Accident
Samruddhi Highway Accident
Published On

Samruddhi Highway Accident News : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झालाय. या अपघातात दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. बुलढाण्यातली डोणगावमधील अग्रवाल पेट्रोल पंपासमोर गुरुवारी सकाळीच भीषण अपघाताची दुर्दैवी घटना घडली. या भीषण अपघातात दोन कामगारांचा मृत्यू झाला. नागपूर कॉरिडॉरजवळ ही दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये आशिष आदिवासी (२१, रा. कुंमरी, जि. आमरोह, मध्य प्रदेश) आणि ज्ञानेश्वर बोरसे यांचा समावेश आहे.

महामार्गावरील झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचं पाणी वापरण्यात येते. त्याच कामासाठी आशिष आणि ज्ञानेश्वर पाण्याचे बॅरल भरून आणण्यासाठी गेले होते. पाण्यासाठी महामार्ग ओलांडताना त्यांनी आजूबाजूला न पाहिल्याने हा अपघात घडला. भरधाव कार चालकाने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु नियंत्रण सुटल्याने कारने आशिषला जोरदार धडक दिली. आशिषचा जागीच मृत्यू झाला. दुसरा कामगार ज्ञानेश्वर गंभीर जखमी झाला होता, पण उपचारादरम्यान त्यानेही प्राण सोडले.

 Samruddhi Highway Accident
Pahalgam Terror Attack : बुलढाण्यातली ५४ पर्यटक, धुळ्यातील २ तृतीयपंथी कश्मीरमध्ये अडकले, सरकारला केली विनंती

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. स्थानिकांनी प्रशासनाकडे कठोर उपाययोजनांची मागणी केली आहे. पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला आहे.

 Samruddhi Highway Accident
Majalgaon : बीड पुन्हा हादरले; आधी खाली पाडला, मग दगडाने मारला, माजलगावची घटना CCTV त कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com