Majalgaon : बीड पुन्हा हादरले; आधी खाली पाडला, मग दगडाने मारला, माजलगावची घटना CCTV त कैद

Beed Crime News : बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये भरदिवसा झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद. उत्तम विघ्ने यांच्यावर दगडाने हल्ला, गंभीर जखमी. कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न.
Majalgaon stone attack CCTV
Majalgaon stone attack CCTVSaam TV News
Published On

योगेश काशिद, साम टीव्ही प्रतिनिधी

Majalgaon stone attack CCTV : बीडमधील गुन्हेगारीच्या दररोज नवनव्या घटना समोर येत आहे. बीडमधील माजलगावमध्ये १५ दिवसांत दोन हत्येच्या घटना घडल्या होत्या. भाजप कार्यकर्त्याला दिवसाढवळ्या संपवण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असतानाच माजलगावमध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भरदिवसा दगडाने ठेचून हत्या करण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बीडमधील कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. उत्तम बाबासाहेब विघ्ने असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

माजलगाव शहरातील तेलगाव रोडवर बुधवारी दुपारी १२ वाजता एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला झाल्याची थरारक घटना घडली. या हल्ल्याची संपूर्ण दृश्यं महेंद्रा ट्रॅक्टर शोरूमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. हल्लेखोराने प्रथम उत्तम बाबासाहेब विघ्ने (३५) यांना लाथा मारून खाली पाडलं आणि त्यानंतर डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केलं. हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. या हल्ल्यात विघ्ने हे गंभीर जखमी झाले आहेत. उत्तम बाबासाहेब विघ्ने यांच्यावर माजलगावमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या पाच दिवसांत दोन हत्या झाल्यानं माजलगावमध्ये कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Majalgaon stone attack CCTV
Mumbai Local : मुंबई लोकलचा खोळंबा, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, चाकरमान्यांची कसरत

हल्ल्यातील जखमी उत्तम विघ्ने यांना तातडीने माजलगावातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सध्या विघ्ने यांची प्रकृती चिंताजनक आहे. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. गेल्या पाच दिवसांत माजलगावात दोन हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही तिसरी घटना घडल्याने शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “पोलिसांचा धाकच उरला नाही का?” असा सवाल केला आहे. माजलगाव ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Majalgaon stone attack CCTV
Beed Crime: बीडमधील गुंडाराज संपेना! धारधार शस्त्राने वार करत हॉटेल मालकाला संपवलं, माजलगावात पुन्हा खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com