

धावत्या बसमधून उडी घेत महिलेची आत्महत्या
गल्लेबोरगाव येथून ही बसमध्ये बसली होती.
कन्नड ते छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या बसमध्ये प्रकार घडला.
माधव सावरगावे, साम प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. एका महिलेनं धावत्या बसमधून उडी घेत महिलेनं आत्महत्या केल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग धुळे-सोलापूर रोडवर घडलीय. बसमधून उडी मारल्यानंतर महिलेचं डोकं चाकाखाली आले. या घटनेनंतर खुलताबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला.
मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड ते छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या बसमध्ये हा प्रकार घडला. एका प्रवासी महिलेनं धावत्या बसमधून उडी मारली. यात घटनेत महिलेचे डोकं बसच्या चाकाखाली आले असून तिचा जागीच मृत्यू झाला. मृत महिला राष्ट्रीय महामार्ग धुळे-सोलापूर रोडवर गल्लेबोरगाव येथून बसमध्ये बसली होती. महिलेने उडी का घेतली याचे कारण अद्याप समजू शकले नाहीये. परंतु बसमधील इतर प्रवासांनी सांगितलेल्या माहितीनुसार मृत महिला मानसीक तणावात होती.
नेहमी प्रमाणे एमएच १४ बी टी ३०३८ क्रमांकाची बस कन्नडवरून छत्रपती संभाजीनगरला निघाली होती. बसमध्ये काही प्रवाशी होते. आपल्या सुरुवातीच्या ठिकाणावरून बस काही प्रवासी घेऊन निघाली. बसने गल्लेबोरगावपर्यंत आपला प्रवास पूर्ण केला होता. गल्लेबोरगाव येथे एका महिलेनं बसला थांबण्यासाठी हात दाखवला. कंडक्टरनं घंटी देत चालकाला बस थांबवण्यास सांगितले. बस थांबल्यानंतर महिला बसमध्ये चढली आणि एक सीटवर जाऊन बसली. त्यानंतर बस परत आपल्या मार्गाला लागली.
पण आपलं अखेरचं ठिकाण येण्याआधीच अनर्थ घडला. कोणालाही कळणआधीच गल्लेबोर गावमधून बसलेल्या महिलेने धावत्या बसमधून उडी मारली. मारताच त्या महिलेचं डोकं बसच्या चाकाखाली आलं. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. धावत्या बसमधून महिलेनं उडी घेतल्यानं बसमध्ये मोठा गोंधळ उडाला. ही घटना जेथे घडली तेथे खुलताबाद पोलीस कर्मचारी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करत पुढील तपास सुरू केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.