Sand Mafia : वाळू माफियांची पुन्हा मुजोरी; तहसीलदाराच्या वाहनावर केली दगडफेक

Sambhajinagar News : प्रशासनाचे यावर लक्ष असून देखील पथकाला न जुमानता वाळू माफिया नदीतून वाळू चोरी करत आहेत. तर कारवाई करण्यासाठी जाणाऱ्या पथकांवर हल्ला करण्यात येत असल्याच्या घटना घडल्या आहेत
Sand Mafia
Sand MafiaSaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : वाळू माफियांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे. वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांच्या पथकावर हल्ला करत त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात रात्रीच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्ला करणाऱ्यांचा तपास सुरु आहे. 

वाळू वाहतुकीस बंदी असताना देखील रात्री वाळू चोरी करण्यात येत आहे. प्रशासनाचे यावर लक्ष असून देखील पथकाला न जुमानता वाळू माफिया नदीतून वाळू चोरी करत आहेत. इतकेच नाही तर कारवाई करण्यासाठी जाणाऱ्या पथकांवर हल्ला करण्यात येत असल्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना संभाजीनगर जिल्ह्यात समोर आली असून रात्री तहसीलदारांवर हल्ला करण्यात आला आहे. 

Sand Mafia
Sangli DCC Bank : साडेपाच हजार मृत कर्जदाराच्या वारसांना नोटीसा; सांगली जिल्हा बँकेकडून आतापर्यंत ७० लाख वसुली

गस्तीवर असताना दिसली वाळू तस्करी  

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात रात्री वाळू माफियांनी तहसीलच्या पथकावर हल्ला केला. रात्री दहा वाजेच्या सुमारास तहसीलदारांचे अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी तहसीलदार वाहन गस्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना उपळी (ता. सिल्लोड) येथील चौफुलीवर अवैधरित्या ट्रॅक्टर वाळू वाहतूक करीत असताना आढळून आले. यामुळे हि वाहतूक रोखण्यासाठी पथक पुढे आले. 

Sand Mafia
Valentine Day : व्हॅलेंटाईनला मावळच्या गुलाबाचा बहर; ८० लाख फुलांची परदेशात निर्यात; गुलाब निर्यातीत मावळ राज्यात प्रथम

वाहनावर दगडफेक करून झाले पसार 

दरम्यान कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर थांबविण्याचा प्रयत्न केला असता काही जणांनी लिक्वीड सदृश पदार्थ तहसीलदारांच्या वाहनावर फेकून समोरील काचेवर दगड मारत ट्रॅक्टर घेऊन पसार झाले. यावेळी वाहनात मंडळ अधिकारी शंकर जैस्वाल यांच्यासह सहा तलाठी, तहसीलदार यांचे अंगरक्षक व वाहन चालक असे नऊ जण होते. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशिरा मंडळ अधिकारी शंकर जैस्वाल यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com